आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Seeks Switzerlands Assistance In Probing Alleged Bank Accounts Of Congress Leader

माजी मंत्र्यांच्या विदेशी खात्यांची चौकशी, भारताने मागिलती स्विस सरकारची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- यूपीए-2 सरकारच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री परनीत कौर यांच्या विदेशी बॅंक खात्यांची चौकशी करण्‍यासाठी भारताने स्विस सरकारची मदत मागितली आहे. परदेशात असलेला काळा पैसा परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अनेक उपाययोजना करीत आहे. जी-20 देशांच्या परिषदेत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद, हवामान बदल आणि काळा पैसा देशात परत आणण्यासाठी जागतिक सहकार्य अपेक्षीत असल्याचे म्हटले होते.

परनीत कौर या पंजाबचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. परनीत कौर यांच्याशिवाय त्यांचे पुत्र रणिंदर सिंग व अनेक नेत्यांच्या विदेशी बॅंक खात्याची भारत सरकार चौकशी करत आहे. स्वित्झर्लंड सरकारकडून या कामात भारत सरकारने मदत मागितली असल्याची माहिती दिली आहे. स्वित्झर्लंड सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, भारत सरकारने नुकतीच परदेशातील बॅंकांमध्ये काळा पैसा जमा करणार्‍यांची एक यादी जाहीर केली होती. यादीत परनीत कौर व त्याचे पुत्र रणिंदर सिंग यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, परनीत कौर यांनी सरकारचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

'द टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, स्वित्झर्लंडमधील एचएसबीसीच्या मुख्य शाखेत परनीत कौर यांचे सध्या कोणतेही अकाउंट नाही. परंतु, परनीत कौर यांचे 10 वर्षांपूर्वी एचएसबीसीच्या मुख्य शाखेत अकाउंट होती, अशी माहिती मिळाली आहे.