आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेट बँकिंगवर कर सवलत शक्य, वीज-पाणी बिलावरही सूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेट बँकिंगच्या माध्यमातून होणार्‍या व्यवहारांवर प्राप्तिकरातून सूट मिळू शकते. इलेक्ट्रॉनिक व्यवहारांच्या माध्यमातून रेल्वे तिकीट खरेदी करणे वा पेट्रोल-डिझेल विकत घेतल्यास काही शुल्कांवर सवलत दिली जाऊ शकते. याचप्रमाणे वीज-पाणी बिलाच्या पेमेंटवर काही डिस्काउंट मिळू शकतो. देशात इलेक्ट्रॉनिक ट्रॅन्झॅक्शनला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने एक मसुदा तयार केला आहे. त्यात हे उपाय सुचवण्यात आले आहेत.
अर्थ मंत्रालयाने या मसुद्यावर २९ जूनपर्यंत सूचना मागवल्या आहेत.

इलेक्ट्रॉनिक व्यवहार वाढल्याने काळ्या पैशांच्या प्रवाहावर आपसूकच लगाम लागेल. या मसुद्यात क्रेडिट- डेबिट कार्डसारख्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स करणार्‍या ग्राहकांना प्राप्तिकरात सवलतीचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स स्वीकारणार्‍या व्यावसायिकांनाही ही सवलत मिळू शकते. तथापि, त्याच्या प्रमाणाचा मसुद्यात उल्लेख नाही. ई-ट्रॅक्झॅक्शनवर व्हॅटमध्ये एक ते दोन टक्क्यांच्या सवलतीचाही एक पर्याय आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते की, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार्‍या वित्तीय व्यवहारांना आणखी चालना देण्यात येईल. रोख खरेदी-विक्रीऐवजी सरकार बँकिंग यंत्रणेच्या माध्यमातून होणार्‍या व्यवहारांवर भर देण्यासाठी पाऊले उचलू इच्छिते. यासाठी एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमांचे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करणे सक्तीचे केले जाऊ शकते. त्यापेक्षा जास्त राेखीच्या व्यवहारांवर शुल्कही आकारले जाऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...