आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रूंवर क्षेपणास्‍त्र डागण्‍यासाठी आता 'घातक' ड्रोन, मंत्रालयाची मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शत्रूंच्‍या तळांचा शोध घेऊन त्‍यांच्‍यावर क्षेपणास्‍त्र डागण्‍याची क्षमता असलेले ड्रोन भारत विकसित करत आहे. एवढेच नाही तर आपली मोहीम फत्‍ते केल्‍यानंतर ते आपल्‍या ठिकाणावर परतही येतील.'घातक' नावाच्‍या या प्रोजेक्टला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
काय आहे प्रोजक्ट 'घातक'?
- प्रोजेक्ट 'घातक' वर 2,650 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या हेर ड्रोन्सला अनमॅन्ड कॉम्बॅट एरियल व्हीकल (UCAV) ही म्‍हटले जाते.
- यापूर्वी ऑटोनॉमस अनमॅन्ड रिसर्च एयरक्राफ्ट (AURA)चे विस्‍तारित रुप आहे.
-AURA च्‍या कॉन्सेप्ट आणि यूटिलिटीच्‍या स्टडीसाठी 2009 मध्‍ये 12.50 कोटी रुपये मंजूर केले होते.
-AURA प्रोजेक्ट 2013 मध्‍ये आपल्‍या निश्चित वेळेत यशस्‍वीपणे पूर्ण झाल्‍याची माहिती नोव्‍हेंबरमध्‍ये संसदेत केंद्रीय मंत्री इंद्रजीत राव यांनी दिली.
- या प्रोजेक्टला डिफेंस मिनिस्ट्रीने हिरवी झेंडी दिली आहे.
कोण बनवणार हे ड्रोन्स? कशी असेल क्षमता?
-एरोनॉटिकल डेव्‍हलपमेंट एजेंसी आणि डीआरडीओ मिळून या प्रोजेक्टवर काम करत आहे. वायूसेनाही यासाठी मार्गदर्शन करत आहे.
- त्‍याचे वजन फाइटर जेटपेक्षा कमी असेल