नवी दिल्ली - इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुरक्षित आणण्यासाठी लष्करी मोहीम राबवली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार नौदल व हवाई दल मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत. नौदलाने आयएनएस म्हैसूरला फारसच्या तर आयएनएस तरकशला अदनच्या आखातामध्ये तैनात केले आहे.
बचाव मोहिमेत दोन्ही जहाजांनी मदत करण्याची सूचना देण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले आहे. हवाई दलाने आपल्या सी-17 व सी-130 जे हक्यरुलस विमानांना अत्यंत कमी कालावधीमध्ये सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी कॅबिनेट सचिवाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेच्या उपाययोजनांवर चर्चा झाली होती. त्याच वेळी गरज भासल्यास लष्कराची मदत घेण्याचा निर्णयदेखील झाला होता. दरम्यान, आयएसआयएसने 39 भारतीयांचे अपहरण केले आहे. त्याचबरोबर 46 भारतीय नर्स तिक्रित येथील रुग्णालयात अडकल्या आहेत. अपहृत नागरिक तसेच नर्स यांच्याविषयी कसलीही माहिती मिळालेली नाही. परंतु सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
राजदूतांना पाचारण
इराकमधील समस्येच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आखाती देशातील सर्व भारतीय राजदूतांना पाचारण केले आहे. रविवारी या गंभीर प्रश्नी बैठक होणार आहे. त्यात कुवेत, कतार, ओमान, सौदी अरेबियातील राजदूत सहभागी होतील. आम्ही भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. इराकमध्ये सुमारे 10 हजार भारतीय राहतात. बहुतेक सर्व नागरिक सुरक्षित ठिकाणी आहेत.
उत्तरेकडे पाडावासाठी सरकारी फौजेची कूच
बगदाद - तिक्रितसह उत्तरेकडील शहरांवर कब्जा मिळवणार्या सुन्नी दहशतवाद्यांचा पाडाव करण्यासाठी रविवारी इराकच्या सरकारी फौजांनी जोरदार लष्करी कारवाई सुरू केली. तोफा आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात धुमश्चक्री सुरू होती. हवाई हल्ल्यात नेमके किती नुकसान झाले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. तिक्रितमध्ये युद्धसदृश परिस्थितीमुळे एकही गावकरी राहिलेला नाही. गावकर्यांनी गाव सोडून सुरक्षित स्थळी आर्शय घेतला आहे.
इराकमधील भारतीय छावण्यांचे संपर्क क्रमांक
नजफ
अबू माथेन जॉर्ज (+ 964 771 6511181)
राकेश सिंह (+964 771 6511179)
ई-मेल: controlroommnazaf@gmail.com
करबला
अनिल सपरा (+964 771 6511180)
जीवन सिंह (+964 771 6511176)
ई-मेल: controlroomkarbala@gmail.com
बसरा
नरसिंहा मूर्ती कुप्पा (+964 771 6511182)
आसिफ शाह अहमद (+964 771 6511178)