आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकला धडकी भरवणारे राफेल शस्त्रागारात येणार, भारत-फ्रान्समध्ये करार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत-फ्रान्स यांच्यात राफेल जेटचा महत्वपूर्ण करार झाला आहे. ३६ विमानांसाठी सुमारे ५९ हजार कोटी रुपयांचा हा करार अाहे. सातत्याने कुरापती करणाऱ्या पाकिस्तानसाठी हा करार धडकी भरवणारा ठरणार आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व त्यांचे समकक्ष जिन ली ड्रायन यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्यात येणार असल्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्या घोषणेच्या १६ महिन्यांनंतर उभय देशांत हा करार प्रत्यक्षात आला आहे. भारताला या विमानांची पहिली खेप ३६ महिन्यांत मिळू लागेल. करारानुसार संपूर्ण ३६ विमाने भारतीय शस्त्रागारात सामील होण्यासाठी ६६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. करारानुसार फ्रान्सकडून भारताला राफेल लढाऊ विमानांच्या दुरूस्ती करून मिळणार आहे. भारताला त्यासाठी खर्च करावा लागणार नाही.दरम्यान, भारताचा हा सर्वात मोठा संरक्षण विषयक करार ठरला आहे.

सरहद्दी बळकट
पाकिस्तान तसेच पूर्व व उत्तरेकडील सीमा अधिक मजबूत करण्याची क्षमता या हवाई खरेदीसंबंधीच्या करारामुळे भारताकडे येणार आहे.

हेही वाचा...भारतापुढे पाकिस्तान दुबळाच, लष्करी सामार्थ्यात जाणून घ्या कोणात किती दम?

59 हजार कोटींमध्ये 36 लढाऊ विमाने....
भारत आणि फान्समध्ये 7.878 बिलियन यूरो (जवळपास 59 हजार कोटी रुपये) मध्ये हा करार झाला आहे. दोन वर्षात भारताला फ्रान्सकडून 36 विमानेे मिळतील. विमानांंची डिलिव्हरी 36 महिन्यात मिळेेल.

अमेरिका आणि रशियाला 'राफेल' ने पछाडले...
- न्यूज एजन्सीनुसार, राफेल करार हा इंडियन एअरफोर्सचा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार मानला जात आहे.
- कराराच्या वेळी फ्रान्सच्या संंरक्षण मंत्र्यासोबत Dassault Aviation चे CEOs उपस्थित होते.
-राफेल विमानाची निर्मिती Dassault Aviation कंपनी करते.
- 2007 पासून भारत-फ्रान्समध्ये या करारावर बोलणी सुरु होती.
- अमेरिकी कंपनी लॉकहीड आणि ‍‍रशियन मिग विमानांच्या तुलनेत भारताने राफेलला प्राधान्य ‍दिले होते.

का आवश्यक राफेल?
- दरम्यान, एअरफोर्सकडे सध्या 44 लढाऊ विमाने आहेत. त्यापैकी 34 विमाने कार्यरत आहेत.
- त्यामुळेे लढाऊ विमाने भारताला आवश्यक होते.
- 1996 मध्ये भारताला रशियाकडून सुखोई 30 एमकेआय मिळााले होते.
- जुने झालेले मिग-21 आणि मिग-27 विमाने ताफ्यातूून हटवण्यात आले आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, असे असेल राफेेल...
बातम्या आणखी आहेत...