आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND ने हा करार स्थगित केल्यास, एका मिनिटात वठणीवर येईल \'उद्दाम\' PAK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताने ठरवले तर तो पाकिस्तानला एका मिनिटात वठणीवर आणू शकतो. उभय देशांंमध्ये 1960 मध्ये सिंंधू पाणी वाटप करार झाला होता. या करारानुसार भारत आपल्या एकूूण सहा नद्यांचे पाणी पाकिस्तानला देत आहे. पण भारताने हा करार स्थगित केल्यास पाकिस्तानला गुढघे टेकण्याची वेळ आल्याशिवाय राहाणार नाही.

पाकिस्तान पूर्णपणे भारताच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यात भारताने पाणी पुरवठा रोखल्यास आधीच आर्थिकदृष्ट्या खिळखिल्या झालेल्या पाकिस्तानाला भिक मागण्याची वेळ येऊ शकते. कारण पाण्यावाचून पाकमध्ये शेती आणि अन्नधान्य उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकाारता येत नाही.

भारत-पाकमध्ये झाला होता हा करार...
- भारत- पाकमध्ये वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनुसार 19 सप्टेंंबर 1960 रोजी कराचीमध्ये इंडस वॉटर ट्रीटी अर्थात सिंधू पाणी वाटप करार झाला होता.
- या करारावर भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे माजी पंंतप्रधान जनरल अयूूब खान यांच्या स्वाक्षरी आहेत.
- करारानुसार, भारत पाकिस्तानला सिंधु, झेलम, चिनाब, सतलज, व्यास आणि रावी नदीचे पाणी देईल.
- या नद्यांचे 80 टक्क्यांहून जास्त पाणी हे पाकिस्तानला मिळते.

पाकिस्ताानवर होईल परिणाम...
- भारताने पाकिस्तानचे पाणी बंंद केल्यास पाण्यावाचून शेती आणि अन्नधान्य उत्पादनावरही विपरीत परिणाम झाल्यावर पाकिस्तान ताळ्यावर येईल.
- कारण, शेती ही पावसाच्या पाण्यावर नव्हे, तर नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे.
- यामुळेेच तर पाकिस्तानचा भारताच्या बगलियार आणि किशनगंगा पॉवर प्रोजेक्ट्सला विरोध करत आहे. यासाठी भारतावर आंंतराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.
- भारताचे हे दोन्ही प्रोजेक्ट्स तयार झाल्यास पा‍‍किस्तानचे तोंंडचे पाणी पळेेल.

अनेकदा झाली आहे करार स्थगित करण्याची मागणी...
- 2005 मध्ये इंटरनॅशल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि टाटा वॉटर पॉलिसी प्रोग्रामने देखील भारत- पाकमधील सिंंधू पाणी वाटप करार स्थगित करण्याची मागणी केली होती.
- या रिपोर्टनुसार, या करारामुळेे जम्मू-काश्मीरचे दरवर्षी 60 हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
- जम्मू-काश्मीर खोर्‍यात 20000 मेगावॅटपेक्षा जास्त वीजनिर्मिती केली जाऊ शकते. पण आज हा करार भारताच्या दोन वीज प्रकल्पांना अडसर ठरत आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, 1960 मध्ये भारत- पाकमध्ये झालेल्या सिंंधू पाणी वाटप कराराशी संंबंंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...