आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादविरोधी मोहिमेसाठी भारत-सिंगापूर यांच्यात करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दहशतवादविरोधी मोहिमेसाठी भारत-सिंगापूर दरम्यान सामंजस्य करारावर सहमती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दहशतवादविरोधी आंतरराष्ट्रीय सहकार्य धोरणाचे समर्थन सिंगापूरने केले असून कट्टरवादविरोधी मोहिमेत भारताला पाठिंबा दर्शवला आहे. दोन्ही देशांतील सहिष्णू संस्कृतीला कट्टरवाद मारक असल्याचे सिंगापूरच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली हसेन लूंग यांच्या दरम्यान दहशतवाद आणि आर्थिक-व्यापारी सहकार्यावर व्यापक चर्चा झाली.

दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रपरिषदेत दहशतवादविरोधी सहकार्यावर भर देणार असल्याचे सांगितले. संरक्षण, व्यापारी सहकार्याविषयीही या वेळी चर्चा झाली. उरी हल्ल्यात मारल्या गेलेल्या जवानांना ली यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

सिंगापूर आणि भारत सायबर सुरक्षेविषयी व्यापक काम करणार असल्याचे मोदी या वेळी म्हणाले. सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापाराचा विकास उभय देश करणार आहेत. भारताच्या संरचनात्मक विकासासाठी सिंगापूर मदत करणार आहे. सिंगापूरचे उपपंतप्रधान थारमन षण्मुगरत्नम आणि भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यादरम्यान आर्थिक सहकार्यावर चर्चा झाली. भारताशी आर्थिक संबंध मजबूत करण्यास सिंगापूर उत्सुक असल्याचे या वेळी ली म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...