आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Pathankot: युनाइडेट जिहाद काउंसिलने घेतली हल्‍ल्‍याची जबाबदारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पठाणकोट एअरबेसवर हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशीही ऑपरेशन संपलेले नाही. शनिवारी पाहाटे 3 वाजता जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तेव्हापासून आतापर्यंत फायरिंग आणि बॉम्बस्फोट सुरू आहे. भारताचे 7 कमांडो आणि जवान शहीद झाले आहे. चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दरम्‍यान, सोमवारी दुपारी दोन दहशतवाद्यांना कंठस्‍थान घालण्‍यास यश आले.
कुणी घेतली जबाबदारी...
- यूनाइडेट जिहाद काउंसिल (UJC) ने म्‍हटले की, हा हल्‍ला आम्‍ही केला आहे.
- सय्यद सलाउद्दीन UJC चा प्रमुख आहे.
- यातील हिजबुल मुजाहिदीन ही संघटना यातील भाग असून, ती सर्वात मोठी आहे.
- जैश-ए-मोहम्मदसुद्धा याच संघटनेची शाखा आहे.
- काउंसिलने म्‍हटले, की काश्मिरी दशहतवाद्यांच्‍या ग्रुपने हा हल्‍ला केला आहे.
ऑपरेशन अंतिम टप्‍प्‍यात, अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेमध्‍ये माहिती
पठाणकोट विमानतळावर दहशतवाद्यांनी शनिवारी हल्‍ला केला. आज (सोमवार) तिसऱ्या दिवशीही हे ऑपरेशन सुरू असून, दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्‍यास आम्‍हाला यश मिळाले. आता ऑपरेशन अंतिम टप्‍प्‍यात आहे, अशी माहिती सैन्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नेमके काय म्‍हणाले अधिकारी ?
- या मोहिमेला यशस्‍वीपणे राबवले जात आहे.
- विमानतळाचा परिसर खूप मोठा आहे. त्‍यामुळे दहशतवाद्यांचा शोध घेण्‍यास विलंब लागत आहे.
- अजून दोन दहशतवादी लपून बसल्‍याची शक्‍यता आहे.
- ते एका दोन मजली इमारतीत आहेत.
- पठाणकोट शहर सुरक्षित असून, कोणत्‍याही सामान्‍य नागरिकाला काहीही इजा झाली नाही

रात्रभर सुरु होती फायरिंग, सकाळी कानी आले स्फोटांचे आवाज... LIVE UPDATES
12.46 PM: एअरबेसच्या एका बिल्डिंमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. येथेच दहशतवादी दडून बसल्याचे वृत्तसंस्था पीटीआयने म्हटले आहे.
12.20 PM: एनएसजी आणि एअरफोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली ऑपरेशनची माहिती.
12:05 PM : पठाणकोट लष्करी छावणीजवळ दोन संशयित दिसल्याचे वृत्त आहे.
12:02 PM : थोड्या वेळात सुरु होऊ शकते एअरफोर्सची पत्रकार परिषद. पत्रकारांना एअरबेसमध्ये बोलावले.
11:30 AM : पठाणकोटमध्ये ऑपरेशन अंतिम टप्प्यात नेण्याच्या तयारीत जवान. थोड्यावेळात ऑपरेशन संपू शकते.
11:25 AM : पंतप्रधानांनी संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक बोलावली.
11:15 AM : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेले. पठाणकोट ऑपरेशनची माहिती देणार.
11:10 AM : वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, अजूनही ऑपरेशन संपलेले नाही.
10:15 AM : क्विक रिस्पॉन्स टीमचे आणखी जवान एअरबेसमध्ये पाठवण्यात आले.
9:40 AM : पठाणकोटवर हेलिकॉप्टर्स फिरत आहेत.
9:25 AM : एअरबेसमध्ये जोरदार स्फोट झाल्याचा आवाज.
9:00 AM : एअरबेसमध्ये रविवारी रात्रभर फायरिंग आणि स्फोटांचे आवाज.
बातम्या आणखी आहेत...