आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषण तर कोलंबोतही कमी नाही, कोहलीचे ट्रिपल शतक रोखण्यासाठी श्रीलंकेने केला ड्रामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दुसऱ्या टेस्टमध्ये पराभव झालेल्या श्रीलंकन टीमने रविवारी दिल्लीतील एअर पॉल्यूशनचा बहाणा करून चार वेळा खेळ थांबवला. टेस्टच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले. वास्तविक, श्रीलंकन खेळाडू पॉल्यूशन आणि खराब एअर क्वालिटीचा बहाणा करत होते, परंतु वास्तवात ट्रिपल शतकाकडे आगेकूच करणाऱ्या विराट कोहलीला त्यांना थांबवायचे होते. यामुळे कोहलीने रागातच इनिंग डिक्लेअर केली. भारतीय खेळाडूंनी मास्कविना फिल्डिंग केली. 3 विकेटही घेतल्या. श्रीलंकेने बहाणा केला, परंतु वास्तवात कोलंबोतही प्रदूषण कमी नाही.
 
रविवारी दिल्ली टेस्टदरम्यान काय झाले होते?
- टेस्टच्या दुसऱ्या दिवशी रविवारी लंकन टीमचे 7 खेळाडू लंच ब्रेकनंतर मास्क घालून मैदानात उतरले. वेगवेगळ्या खेळाडूंमुळे चार वेळा खेळ थांबवावा लागला. यामुळे 26 मिनिटे खेळ होऊ शकला नाही.
- आधी 122 आणि 124व्या ओव्हरमध्ये सामना थांबला. यानंतर 127व्या ओव्हरदरम्यान सामना थांबवण्यात आला.
- श्रीलंकेचे प्लेअर्स खराब एअर क्वालिटीची तक्रार करत होते. यादरम्यान तब्बल 20 हजार प्रेक्षक उपस्थित होते. ते सर्व श्रीलंकेविरुद्ध- लुजर्स... लुजर्सच्या घोषणा देत होते.
 
हे आहे वास्तव...
 
1) कोहलीला रोखण्यासाठी केला तमाशा
- बीसीसीआयचे अॅक्टिंग प्रेसिडेंट सी. के. खन्ना म्हणाले, विराटचे तिहेरी शतक रोखण्यासाठी श्रीलंकेने तमाशा केला. टीम इंडिया, 20 हजार प्रेक्षकांना त्रास का झाला नाही? मला आश्चर्य वाटतेय की, श्रीलंकेच्या संघाने एवढा ड्रामा केला. मी याबाबत सेक्रेटरींशी बोलणार आहे आणि श्रीलंकन बोर्डाला पत्र लिहायला सांगणार आहे."
 
2) दिल्लीत शनिवारपासून फक्त 3.5%  जास्त होते पॉल्यूशन
 
पॉल्यूशन 3 डिसेंबर 2 डिसेंबर
पीएम-2.5 366 316
पीएम-10 175 142

(पीएम 2.5-60 आणि पीएम 10-100 मायक्रोग्राम्स असले पाहिजे.)

 

3) श्रीलंकेत प्रदूषण नियंत्रणासाठी आर्मी-नेव्हीची मदत घ्यावी लागली

- 2016 मध्ये दिल्लीत 2.2 पट, तर कोलंबोत 3.6 पट जास्त प्रदूषण होते. वर्षभर श्रीलंकेतही क्रिकेट खेळण्यात आले. तेथे ना श्रीलंकेच्या खेळाडूंनी मास्क घातले, ना इतर देशांच्या खेळाडूंनी.
- श्रीलंकेत 2017 मध्येही प्रदूषण एवढे वाढले होते की, प्रदूषण नियंत्रणासाठी नेव्ही आणि आर्मीची मदत घ्यावी लागली. श्रीलंकेचे मंत्री पताली चंपिका रानावाका यांनी मागच्या नोव्हेंबरमध्येच ही बाब कबूल केली होती.

 

4) विराट दोन दिवसांपासून खेळतोय, मास्कची गरज नाही पडली
- भारताचे बॉलिंग कोच भारत अरुण म्हणाले, विराट कोहलीने दोन दिवस बॅटिंग केली, त्याला मास्कची गरज नाही पडली. आमचा फोकस आमच्या खेळावरच होता. दोन्ही संघाची परिस्थिती एकसारखीच होती. आम्हाला काहीही अडचण झाली नाही.

 

काय म्हणाले श्रीलंकन कोच?
- श्रीलंकेचे इंटरिम कोच निक पोथास म्हणाले, गमागे आणि लकमल यांना त्रास होत होता. मॅच रेफरी आणि डॉक्टर दोघेही आमच्या ड्रेसिंग रूममध्ये होते. लकमलला सारख्या उलट्या होत होत्या. धनंजय डिसिल्व्हाही उलट्या करत होता. हे खूप वाईट आहे. अशा वेळी आम्ही फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यावर अवलंबून असतो, कारण आम्ही काही वैद्यकीय तज्ज्ञ नाही. दुसऱ्या दिवशी खेळायचे अथवा नाही, हे आमचे ऑफिशियल्स ठरवतील.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...

 

>>हेही वाचा

काेहलीचा द्विशतकाचा विश्वविक्रम! भारतीय संघाने 7 बाद 536 धावांवर डाव केला घाेषित

बातम्या आणखी आहेत...