आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Strongly Condemns \'derogatory\' Article Against Jayalalithaa

श्रीलंकेचा आक्षेपार्ह्य लेख : संसदेत गदारोळ, केंद्र सरकार उच्चायुक्तांना पाचारण करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याविरोधात श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवरील आक्षेपार्ह्य लेख आणि फोटो प्रकरणाचा निषेध करत अण्णा द्रमुकच्या (एआयएडीएमके) सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. या गदारोळातच केंद्र सरकारने या लेखाची निंदा करतानाच श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना याचा जाब विचारला जाईल असे म्हटले आहे.
या मुद्यावर एआयएडीएमके सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे राज्यसभेत प्रश्नोत्तरांचा तास होऊ शकला नाही. लोकसभेचे कामकाज देखील याच मुद्यावरुन दोन वेळा स्थगित करण्यात आले.
राज्यसभेचे कामकाज सोमवारी सकाळी दोन वेळा तहकूब केल्यानंतर दुपारी 12 वाजता पुन्हा सुरु झाले तेव्हा एआयएडीएमकेचे व्ही. मैत्रेन म्हणाले, एका पत्रकाराद्वारा लिहिलेला आक्षेपार्ह्य लेख श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आहे. हे कदापी सहन केले जाणार नाही. या लेखात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेच्या नेत्या जयललिता यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य टिप्पणी करण्यात आली आहे. त्यांनी मागणी केली, की या संबंधी भारतातील श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना याबद्दल जबा विचारला पाहिजे.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, 'हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. भारत अशाप्रकारच्या कृत्याचा कडाडून विरोध करतो. या प्रकरणी श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना बालावून त्यांना भारत सरकारच्या विरोधाची कल्पना दिली जाईल.'
लोकसभेत हा मुद्या एआयएडीएमकेचे एम. थंबीदुराई यांनी उपस्थित केला. आक्षेपार्ह्य लेखाचा सरकारने निषेध केला नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सरकारवर टीका केली. ते म्हणाले, 'या प्रकरणी तामिळनाडूच्या जनतेत प्रचंड रोष आहे. सरकारने याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे.'

थंबीदुराई म्हणाले, 'जयललिता यांनी तामिळ मच्छिमारांचा श्रीलंकेच्या नौदालाकडून वारंवार छळ होतो आणि कच्चातिवू द्विप परत घेण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक पत्र लिहिली आहेत. त्यांचा उल्लेख 'प्रेमपत्र' असा करणे अतिशय खेदजनक आहे.'
या आक्षेपार्ह्य लेखाचा केंद्र सरकारने अद्याप निषेध केला नसल्याचे सांगत थंबीदुराई यांनी लोकसभेत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'सत्ताधारी पक्षाने निवडणुकीआधी श्रीलंकेच्या प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता आम्हाला प्रश्न पडला आहे, की एनडीएचे सरकार तामिळींच्या बाजूचे आहे की श्रीलंकेच्या. कारण सरकारने या लेखाचा अजून निषेध सुद्ध केलेला नाही.'
ते म्हणाले, 'सरकार यासंबंधी काय कारवाई करणार, हा आमचा प्रश्न आहे.' लोकसभा अध्यक्षांना उद्देशुन ते म्हणाले, 'तामिळनाडूच्या मुख्यमंत्री एक महिला आहेत आणि आपणही एक महिला आहात. आता तुम्हीच सांगा पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रांचा 'प्रेमपत्र' असा उल्लेख केला तर कसे वाटेल '
थंबीदुराई यांनी या आक्षेपार्ह्य लेखा बद्दल कडक कारवाईची मागणी केली.