आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Summons Pak High Commissioner Over LoC Violations.

पाकिस्तानची दुटप्पी भूमिका पुन्हा उघड; सीमेवर गोळीबार, सहा ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू/ दिल्ली- पाकिस्तानची दुटप्पी भूमिका पुन्हा उघड झाली. शनिवारी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताला स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पाकने जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सीमेवरील चौक्यांबरोबरच नागरी भागावरही गोळीबार केला. त्यात बसौनीच्या सरपंचासह पाच जणांचा, तर रविवारी सकाळच्या गोळीबारात बहरोट गावात महिलेचा मृत्यू झाला.

परराष्ट्र मंत्रालयाने पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून त्यांच्याकडे निषेध नोंदवला. बासित यांनी चूक कबूल करण्याऐवजी भारतावरच ७० वेळा शस्त्रसंधी मोडल्याचा आरोप केला.
सीमेवर दहशत, लोकांचे पलायन
पाककडून आठवडाभरापासून होणाऱ्या गोळीबारामुळे पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेलगतच्या (एलओसी) गावांत दहशत आहे. एकाच वेळी सहा जणांचा मृत्यू तसेच अनेक जण जखमी झाल्याने भीतीचे वातावरण आहे. शनिवारी रात्रीपासूनच पलायन सुरू आहे. लष्कराच्या सल्ल्यावरून बालाकोट, साबजिया, हमीरपूरसह अनेक गावांतून लोक सुरक्षित स्थळी पोहोचले. पाकने मनकोट सेक्टरपासून बालाकोटपर्यंत गोळीबार केला. मेंढर, साबजिया, मंडी, हमीरपूर सेक्टरमध्ये शनिवारी संध्याकाळी सातपर्यंत गोळीबार सुरू होता. रात्री १२ वाजेपासून रविवारी सकाळपर्यंत गोळीबार सुरू होता.
घराबाहेर पडू नका, लोकांना सल्ला : सुरक्षिततेसाठी घरांतच थांबा, असे आवाहन लष्कर, पोलिसांनी केले आहे. लोकांनी रस्त्यांचा वापर करू नये म्हणून तेथे जवान तैनात करण्यात आले. पाकिस्तानचे तोफगोळे या रस्त्यांपर्यंत पोहोचत आहेत.