आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने PAKला बजावले, काश्‍मीर नाही, फक्त सीमेवरील दहशतवादावर होईल चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे परराष्‍ट्र सचिव एस.जयशंकर - Divya Marathi
भारताचे परराष्‍ट्र सचिव एस.जयशंकर
नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानचे काश्‍मीरबाबचे दोन प्रस्ताव फेटाळले आहेत. चर्चा जर होणार असेल तर ती सीमेवरील दहशतवादावर होईल. पाकिस्तानने 15 व 19 ऑगस्ट रोजी भारताला चर्चेसाठी आंमत्रि‍त केले होते. यात काश्‍मीर मुद्द्यावर बोलले जाणार होते. काश्‍मीर खो-यात 48 दिवसांपासून संचारबंदी असून आतापर्यंत हिंसेत 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान का चर्चेची तयारी दाखवत आहे...
- काश्‍मीरमध्‍ये 8 जुलै रोजी हिजबुल कमांडर बु-हान वानी चकमकीत मारला गेला होता. यानंतर खो-यात हिंसेचे सत्र सुरु झाले. सुरक्षा दलांवर दगडफेकीचे प्रकार वाढले. काही ठिकाणी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या गेल्या.
- हिंसेत 68 लोक मारले गेले. तीन हजार लोक जखमी झाले. यात सुरक्षा दलांच्या जवानांचाही समावेश आहे.
- पाकिस्तान या हिंसेला खतपाणी घालत आहे. दरम्यान नरेंद्र मोदींनी बलुचिस्तानचा मुद्द उपस्थित करुन या देशाला मागे खेचले.
एजाज अहमद चौधरीने पाठवले होते आमंत्रण
- माध्‍यमांमधील बातम्यांनुसार, 15 व 19 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचे परराष्‍ट्र सचिव एजाज अहमद चौधरींनी भारताचे परराष्‍ट्र सचिव एस. जयशंकर यांना भारतीय उच्चायुक्ताच्या माध्‍यमातून दोन अधिकृत पत्र पाठवले होते. यात काश्‍मीरवर चर्चा करण्‍याचा प्रस्ताव होता.
- जयशंकर यांनी बुधवारी चौधरी यांना उच्चायुक्तांच्या माध्‍यमातून उत्तर पाठवले. म्हणाले, भारतासाठी मुख्‍य मुद्दा सीमेवरील दहशतवाद आहे. यात पा‍कव्याप्त काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित केला गेला आहे.
भारताचा मार्ग कोणता?
- पाकिस्तान काश्‍मीरमध्‍ये दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा पुरावा भारताकडे आहे. नुकतेच हिजबुल व लष्‍कर या दहशतवादी संघटनांशी संबंधित पाकिस्तानी दहशतवाद्यांना संरक्षण संस्थांनी पकडले आहे.
- या दहशतवाद्यांनी चौकशी कबूल केले की त्यांना पाकिस्तानमध्‍ये प्रशिक्षण दिले गेले. भारताने पाकिस्तानला पुरावा म्हणून अटक केलेल्या दहशतवाद्यांचे कबूलनामाही सदर केले आहे.
बातम्या आणखी आहेत...