आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या 7 वर्षांत भारत होणार सर्वाधिक लोकसंख्येचा देश, वृद्धांची संख्या दुप्पट होणार - यूएन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2030 पर्यंत भारताची लोकसंख्या 150 कोटींपर्यंत जाणार - यूएन - Divya Marathi
2030 पर्यंत भारताची लोकसंख्या 150 कोटींपर्यंत जाणार - यूएन
संयुक्त राष्ट्र / नवी दिल्ली - 2024 पर्यंत भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक होणार आहे. अर्थातच येत्या 7 वर्षांत भारत सर्वाधिक लोकसंख्येचा राष्ट्र होणार आहे. यापूर्वीही संयुक्त राष्ट्रने भारत सर्वाधिक लोकसंख्येचा राष्ट्र होणार असे भाकित दर्शवले होते. मात्र, केवळ 7 वर्षांतच हे बदल होतील असे म्हणण्याची ही पहिलीच वेळ आहे. यूएनच्या अहवालानुसार, 2030 पर्यंत भारताची लोकसंख्या 150 कोटींचा पल्ला गाठणार आहे. तर, 2050 पर्यंत जगाची एकूण लोकसंख्या तब्बल 10 अब्जांपर्यंत जाणार आहे. 
 
ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढणार 
- हा अहवाल यूएनच्या आर्थिक आणि सामाजिक विभागाने सार्वजनिक केला आहे. यास 'द वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉस्पेक्ट्स: द 2017 रिवीझन' या नावाने ओळखल्या जात आहे. 
- यूएनच्या अहवालानुसार, सध्या जगाची एकूण लोकसंख्या 7.6 अब्ज आहे. 2050 पर्यंत ती वाढून तब्बल 9.8 अब्जांवर पोहचणार आहे. 
- 2050 पर्यंत नायजेरियाची लोकसंख्या अमेरिकेहून अधिक होणार आहे. यासोबतच नायजेरिया जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार आहे. 
- 2050 पर्यंत भारतात ज्येष्ठ नागरिकांची अर्थातच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांची संख्या दुप्पट होईल. 
- सध्या भारतात 14 कोटी नागरिकांचे वय 60 किंवा त्यापेक्षा अधिक आहे. ही आकडेवारी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 11 टक्के आहे.
 
आताच भारताची लोकसंख्या 134 कोटी
- भारत आणि चीनच्या लोकसंख्येमध्ये सध्या अवघ्या 7 कोटींचा फरक आहे. भारताची लोकसंक्या 134 कोटी तर चीनची लोकसंख्या 141 कोटी एवढी आहे. 
- अहवालातील अंदाजानुसार, जगाच्या लोकसंख्येत दरवर्षी 8.3 कोटींची वाढ होत आहे. 
- सर्वात मोठ्या चिंतेची बाब म्हणजे, लोकसंख्या वाढत असताना अन्नाधान्य उत्पादनात मोठी घट होत आहे. अशात जगभरात अन्नसंकट निर्माण होऊ शकतो.
 
पुढे... यानंतर भारताच्या लोकसंख्येत घट होत जाणार...
 
बातम्या आणखी आहेत...