आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India To Build Pipeline To Nepal For Oil Products

भारत-नेपाळ 81 किमी तेल पाइपलाइनचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत-नेपाळ आर्थिक संबंधांत सुदृढता आणण्याच्या दिशेने ऑइल पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव भारताने दिला आहे. ही 81 किमीची पाइपलाइन मोतीहारी (बिहार) पासून नेपाळपर्यंत टाकण्याचे सध्या प्रस्तावित आहे. यासाठी भारत 200 कोटींची गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काठमांडू येथे सांगितले.

नेपाळ इंधनासाठी भारतावरच अवलंबून आहे. भारतातून सध्या पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस व जेट इंधनाची ट्रकद्वारे नेपाळला निर्यात होते. यात इंधन चोरीचे व भेसळीचे प्रकार वाढत आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या राक्शाल येथून नेपाळला इंधन पुरवठा करण्यात येतो. वर्ष 2006 मध्ये नेपाळ-भारत ऑइल पाइपलाइनचा प्रस्ताव मंजूर झाला होता. मात्र, नेपाळने यात गुंतवणूक करण्यास माघार घेतल्यानंतर हा प्रकल्प रद्द झाला होता. या प्रकल्पाचे काम फार अवघड नसले तरी यातील वैधानिक बाबी उभय राष्ट्रांत स्पष्ट असणे गरजेचे असल्याचे इंडियन ऑइलच्या उच्चाधिकार्‍यांनी सांगितले आहे.

व्हिजिटर बुकमध्ये मोदींचा अभिप्राय
मंदिरात रुद्राभिषेक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील व्हिजिटर बुकमध्ये अभिप्राय नोंदवला. ‘बागमती किनार्‍यावरील पशुपतिनाथ मंदिर हे श्रद्धेचे केंद्र आहे. श्रावण सोमवारी येऊन मी भावनाविवश झालो आहे. दोन्ही देशांवर कृपा अशीच राहो हीच माझी मनोकामना आहे,’ या शब्दांत त्यांनी अभिप्राय नोंदवला.

(फोटो : नेपाळचे राष्ट्रपती रामबरन यादव यांच्याशी काठमांडूत चर्चा करताना पंतप्रधान मोदी. सोमवारी त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशीही चर्चा केली)