आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India To Commission 5 mt Underground Oil Storages By October

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वस्त दरामुळे भारत कच्च्या तेलाचा साठा वाढवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा कमी होत असलेला दर पाहता भारताची वित्तीय तूट कमी करण्याच्या दृष्टीने देशात या तेलाचा सुमारे ५० लाख टन साठा करून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भारत कच्च्या तेलाचा सर्वांत मोठा आयातदार देश आहे. आगामी काळात पुन्हा हे दर वाढले तर त्याचा एकदम फटका बसू नये म्हणून सरकारने या उपाययोजनेवर विचार सुरू केला आहे.

विशाखापट्टणम येथे वाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या ठरणार्‍या ठिकाणी कच्च्या तेलाचा साठा करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली असून फेब्रुवारी महिन्यात हे काम सुरू होणार आहे. तेल साठवणूक भांडारांपैकी साडे दहा लाख टन साठवणूक क्षमता असलेल्या पहिल्या भांडाराचे काम पहिल्या टप्प्यात सुरू होईल.

इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन के. पिल्लई यांनी सांगितले, आम्ही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहोत. तांत्रिकदृष्ट्या साठवणूक क्षमता असलेल्या पहिल्या भांडाराचे काम सुरू करणे कठीण नाही. सद्यस्थितीत कच्च्या तेलाचा दर ५० डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे आणि रुपया ६१ ते ६२ रुपये प्रति डॉलरच्या जवळपास स्थिरावलेला आहे. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी २४०० कोटी खर्च करून विशाखापट्टणम येथे भांडार उभारले जात आहे. या भांडाराच्या निर्मितीनंतर प्रति बॅरलमागे १७-१८ डॉलरची बचत अपेक्षित आहे.

पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणार्‍या तीन भांडारांसाठी एकूण ३९५८ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यांमध्ये २५ हजार कोटी रुपयांच्या ५० लाख टन कच्च्या तेलाची साठवणूक केली जाणार आहे.

आर्थिक झळ कमी होईल
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्यात तेलाचे दर अचानक वाढतात किंवा कमी होतात. या चढ-उतारामुळे अनेकदा भारताला आर्थिक फटका असतो. साठवणुकीची व्यवस्था झाल्यास ही आर्थिक झळ कमी प्रमाणात बसेल.

तेलाची स्थिती
- १८९ दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात गेल्या आर्थिक वर्षात.
- १४३ अब्ज डॉलर खर्च झाला.
- १३ दिवस पुरेल इतक्याच तेलाचा सध्या साठा होऊ शकतो.
- ९० दिवस पुरेल इतकी तेलाची साठवणूक क्षमता २०२० पर्यंत करण्याचे ध्येय.