आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तान, चीनच्‍या अगोदर भारताला मिळाले MTCR गटाचे सदस्‍यत्‍व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनमुळे भारताला एनएसजीचे सदस्‍यत्‍व मिळाले नाही. पण, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण अधिकारिणीत (MTCR) सोमवारी भारताला पूर्ण सदस्याचा दर्जा देण्यात आल्याची माहिती फ्रान्सच्या दुतावासाने केंद्र सरकार तसेच भारताच्या नेदरलंड आणि लक्झेंबर्ग येथील दुतावासला कळवली आहे. या गटातील भारत हा 35 वा देश आहे. या अधिकारिणीत भारताला स्‍थान मिळाल्‍यानंतर अमेरिकेकडून ड्रोन विमानांची खरेदी, तसेच आपली उच्च तंत्रज्ञानयुक्त क्षेपणास्त्रे मित्र देशांना निर्यात करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.
एका वर्षापासून प्रयत्‍न सुरू...
> या अधिकारिणीत भारताला सदस्‍यत्‍व मिळावे, यासाठी एका वर्षांपूर्वीच आम्‍ही अर्ज भरला होता, अशी माहिती परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ता विकास स्वरूप यांनी दिली.
> त्‍यांनी सांगितले, या अधिकारिणीत भारताला सहभागी करून घेण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, फक्‍त घोषणेचीच औपचारिकता बाकी आहे.
> सोमवारी यावर परराष्‍ट्र सचिव स्‍वाक्षरी करणार आहेत.
> विशेष म्‍हणजे एनएसजीमध्‍ये भारताच्‍या प्रवेशाला विरोध करणारा चीन या अधिकारिणीत सदस्‍य नाही.
> चीनने संघटनेची मार्गतत्त्वे पूर्णपणे पाळू असे लेखी आश्वासन 1991 मध्‍ये दिले होते आणि त्यानंतर 2004 मध्‍ये सदस्यत्वासाठी अर्जही केला होता.
> मात्र चीनची वर्तणूक पाहून त्या देशाला सदस्यत्व देण्यास संघटनेतील सहभागी देशांनी स्पष्ट नकारच दिला.
> पाकिस्‍तानही या गटाचा सदस्‍य नाही.
एनएसजीसाठी आशा पल्‍लवित
या गटाचे सदस्यत्व मिळाल्याने एनएसजी, ऑस्ट्रेलिया गट आणि वेसनार ऍरेंजमेंट या इतरही गटांचे सदस्यत्व मिळण्याच्‍या आशा पल्‍लवित झाल्‍या.
गत वर्षी इटलीने केला होता विरोध
> यूएससोबत आण्विक करार केल्‍यानंतर भारत एनएसजी आणि एमटीसीआर या गटांत सहभागी होण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहे.
> आण्विक, जैविक आणि रासायनिक शस्‍त्रांवर नियंत्रण ठेवण्‍याचे हे दोन्‍ही गट काम करतात.
> पाणबुडीच्‍या वादामुळे गत वर्षी इटलीने भारताच्‍या एमटीसीआर प्रवेशाला विरोध केला होता.
> इटलीच्‍या दोन सैनिकांवर भारताच्‍या मासेमारांच्‍या हत्‍येचा आरोप आहे. हे दोघेही सध्‍या इटलीत आहेत.
काय आहे MTCR?
> 1987 मध्‍ये या गटाची स्‍थापना झाली. सुरुवातीला यामध्‍ये G-7 देश अमेरिका, कॅनाडा, जर्मनी, जापान, इटली, फ्रान्‍स आणि ब्रिटेनचा सहभाग होता.
> चीन MTCR चा सदस्‍य नाही. पण, या गटाचे मार्गदर्शक‍ तत्‍वे मानण्‍यास तयार आहे.
> बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, तसेच मानवरहित पुरवठा यंत्रणेचा विस्तार मर्यादित करणे असा आहे, 34 देशांच्‍या गटाचा उद्देश आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, भारताचा फायदा - तोटा काय ?
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...