आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने युनोत प्रथमच मांडला बलुचिस्तान, व्याप्त काश्मीरचा मुद्दा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानातील बलुचिस्तान व व्याप्त काश्मीरमधील मानवाधिकाराचा मुद्दा भारताने प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघातील मानवाधिकार परिषदेच्या ३३ व्या अधिवेशनात पाकिस्तानला या मुद्द्यावरून घेरताना भारताने पाकवर जोरदार टीका केली. पाकने आपली ऊर्जा आपला देश व व्याप्त काश्मीरमधील मानवाधिकाराची स्थिती सुधारण्यासाठी खर्च करावी, असा सल्लाही भारताने दिला.

संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत अजित कुमार यांनी सांगितले, ‘संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे. पाकने बेकायदा ताबा घेतलेला काही भाग आता मुक्त करणे शिल्लक आहे, असे मी ठासून सांगितले.’

पाकिस्तानला शह
गेल्या १५ ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या मुद्द्यावर चर्चा झडली आहे. यामुळे पाकची डोकेदुखी वाढली आहे. आता हा मुद्दा उपस्थित करून भारताने पाकची अधिकच गोची केली. पाकने जम्मू-काश्मीरमध्ये चालवलेल्या दहशतवादी कारवायांचा मुद्दाही याच अधिवेशनात भारताने मांडला. मानवाधिकार परिषदेचा भारताविरुद्ध गैरवापर करण्याचा प्रयत्न पाकने आजवर केला. मात्र, या वेळी बलुचिस्तान व व्याप्त काश्मीरमधील मानवाधिकाराचा मुद्दा मांडून भारताने पाकला शह दिल्याचे मानले जाते.
बातम्या आणखी आहेत...