आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India To Skip Bharat Stage V, Stricter Car Emission Norms Advanced To 2020

वाहनांसाठी एप्रिल 2020 पासून बीएस-6 मानक लागू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकारने गाड्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी एप्रिल २०२० पासून बीएस-५ (भारतीय मानक) ऐवजी थेट बीएस- सहा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मानक गाड्यांतून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषण घटकांशी संबंधित आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. गडकरी यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले की, मी आणि सहकारी मंत्र्यांनी एक एप्रिल २०२० पासून थेट बीएस-सहावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच यासंदर्भात एक अधिसूचना जारी करेल. पेट्रोलियम मंत्रालयाने एक एप्रिल २०२० पासून देशभरात बीएस-६ इंधनाच्या पुरवठ्याचे आश्वासन दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सरकारला सांगितले हाेते की, त्यांनी एप्रिल २०२१ च्या मुदतीआधी एक वर्ष बीएस-सहा लागू करण्याचा प्रयत्न करावयास हवा. मंत्रालयाने याआधी जारी अधिसूचनेत एप्रिल २०२१ पासून बीएस- लागू करणार असल्याचे म्हटले आहे. २०१९ पासून बीएस-५ लागू होणार होते.

संपूर्णदेशात पुढील वर्षी बीएस-४ : यावेळी देशातील उत्तर राज्यात आणि उर्वरित भागातील ३३ शहरांमध्येच केवळ बीएस-४ इंधन पुरवठा केला जातो. उर्वरित देशात बीएस-३ श्रेणीचे इंधन दिले जाते. एप्रिल २०१७ पासून संपूर्ण देशात बीएस-४ श्रेणीतील इंधन मिळेल.

वाहन निर्मात्या कंपन्यांची संघटना सियामचे महासंचालक विष्णु माथूर यांनी एक एप्रिल २०२० पासून बीएस-६ मानक लागू करण्याचा सरकारचा निर्णय अव्यवहारिक ठरवला. माथूर म्हणाले, आम्ही हे करू शकत नाहीत. हे तंत्रज्ञान वाहन निर्मात्या कंपन्या डिझाइन करत नाहीत. तंत्रज्ञान पुरणाऱ्या कंपन्यांकडून ते मिळते. सुरक्षेची खात्री नसताना ते तंत्रज्ञान देऊ शकत नाही.