आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदमानात दिसली चीनी पाणबुडी, भारत-यूएस करत आहे देखरेखीबाबत प्लॅनिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / हाँगकाँग - दक्षिण चीन समुद्रानंतर आता हिंदी महासागरात चीनचा हस्‍तक्षेप वाढत आहे. मागील तीन महिन्‍यात चार वेळा चीनी पाणबुडी अंदमानाच्‍या जवळ दिसून आल्‍या. दुसरीकडे भारत व अमेरिकेमध्ये हिंदी महासागरामधील पाणबुड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एकमेकांस मदत करण्यासंदर्भातील चर्चा सुरु आहे. त्‍यामुळे यापुढे दोन देशांमधील संरक्षणात्मक सहकार्य आणखी बळकट होण्याची शक्‍यता आहे. गेल्‍या महिन्‍यातच भारताने अमेरिकेला आपले सैन्य तळ वापरण्‍याला परवानगी दिली होती. हिंदी महासागरात चीनच्‍या हस्‍तक्षेपामुळे भारत आणि यूएस अस्वस्थ...
- एका भारतीय नौदलाच्‍या अधिका-याने सांगितले की, सरासरी दर तीन महिन्‍यात चीनी पाणबुडी चार वेळा अंदमान आणि निकाेबारजवळ दिसते.
- चीन दक्षिण चायना समुद्रातून या भागात प्रवेश करते. याच रस्‍त्याने चीनचे 80% इंधन सप्‍लाय केले जाते.
- एका यूएस अधिका-याच्‍या मतानुसार, भारत आणि अमेरिका लवकरच पाणबुडीविरोधातील अत्यंत संवेदनशील तंत्रज्ञानाबाबत म्‍हणजे अँटी सबमरीन्स वॉरफेयरवर (एएसडब्ल्यू) बैठक घेणार आहे.
- शिवाय मिलिट्री टेक्नॉलॉजी आणि धोरण परस्‍परांमध्‍ये शेयर केले जाणार आहे.
- दोन्‍ही देशातील नौदलाचे संबंध सुरळीत व्‍हावे हा या कारवाईमागील उद्देश आहे.
- या भागात भारत-यूएस आधीपासून ज्वॉइंट नेवल एक्सरसाइज करत आहे. यामध्‍ये पी-8 एयरक्राफ्टच्‍या नवीन व्‍हर्जनचा वापर केला जात आहे.
- शिवाय, भारत-यूएस अाणि जपान या वर्षी जूनमध्‍ये अँटी सबमरीन एक्सरसाइज करण्‍याच्‍या तयारीत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...