आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मुलाखतीतून बोफोर्स उल्लेख टाळण्यासाठी भारताने दिली होती धमकी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वादग्रस्त बोफोर्स तोफांच्या व्यवहारासंबंधी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे विधान प्रकाशित करणाऱ्या स्विडीश वृत्तपत्राला भारत सरकारने धमकी दिली आहे. स्विडीश वृत्तपत्र 'डॅगेन्स नायहेटर'ने प्रकाशित केलेल्या राष्ट्रपतींच्या मुलाखतीनंतर भारतीय राजदुताने संपादकांची भेट घेऊन बोफोर्सवरील विधान प्रकाशित करायचे नव्हते. राजदुतांनी तर राष्ट्रपतींचे विधान वृत्तपत्रात प्रकाशित झाल्याने स्विडनचा दौरा देखील रद्द होऊ शकतो असे सांगितले आहे.
31 मे पासून राष्ट्रपतींचा स्विडन दौरा सुरु होत आहे. त्याआधी स्विडनच्या वृत्तपत्राने प्रणव मुखर्जींची दिल्लीत मुलाखत घेतली होती. मुलाखतीत राष्ट्रपतींनी बोफोर्स प्रकरणाला मीडिया ट्रायल संबोधले होते. मुखर्जी म्हणाले होते, 'बोफोर्स व्यवहारानंतर मी बराच काळ संरक्षण मंत्री राहिलो होतो. आमच्या लष्कर प्रमुखांनीही बोफोर्सबद्दल चांगले उद्गार काढले होते. आजही भारतीय सैन्य त्यांचा वापर करत आहे. तुम्ही ज्या कथित घोटाळ्याबद्दल बोलत आहात, ते मीडियामध्ये चवीने चर्चीले गेले होते. ती मीडिया ट्रायल होती.'
बातम्या आणखी आहेत...