आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Warns China, We Send Out Ship And Plane In South China Sea

US नंतर भारताचा चीनला इशारा, \'दक्षिण चीन सागरात जहाजे पाठवायला आम्ही मुक्त\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दक्षिण चीन सागरात सुरु असलेल्या चीनच्या हुकुमशाहीला अमेरिकेनंतर भारतानेही आव्हान दिले आहे. भारताने इशारा देत म्हटले. 'दक्षिण चीन सागरात जहाज पाठवण्यास आणि उड्डाण करण्यास आम्ही मुक्त आहोत. हा भाग फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन अंतर्गत येतो. जर याबद्दल काही वाद असतील तर ते आंतरराष्ट्रीय कायद्यानूसार सोडवले पाहिजे.' अमेरिकेने गेल्या आठवड्यात दक्षिण चीन सागरात जहाज पाठवले होते. त्यावर चीनने आक्षेप घेतला होता. त्यांनी अमेरिकेच्या जहाजाचा पाठलाग देखिल केला होता.

भारताने प्रथमच कठोर धोरण स्विकारले
एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तात म्हटले, 'वादग्रस्त दक्षिण चीन सागराच्या मुद्यावर भारताने एवढे कठोर धोरण प्रथमच स्विकारले आहे.' भारताचा 55% सागरी व्यवहार याच मार्गाने होतो, हे येथे महत्त्वाचे आहे.
वादग्रस्त भागाला नवे नाव देणार भारत
>> भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतीच फिलिपिन्सच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी दक्षिण चीन सागर या वादग्रस्त भागाला पश्चिम फिलिपिन्स सागर नावाने यापुढे ओळखले जाईल असे आश्वासन दिले होते.
>> दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांच्या संयुक्त निवदेनात याच नावाचा उल्लेख केला होता.
>> दक्षिण चीन सागराच्या 90 % भागावर चीनने केलेला दावा भारताने फेटाळला होता.

काय आहे वाद
> चीनने दक्षिण चीन सागरात 12 समुद्री मीलवर हक्क सांगितला आहे. या भागाला 12 नॉटिकल मील टेरिटोरियल लिमिट म्हणतात. हा भाग दक्षिण चीन सागरात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम बेटाच्या आसपास आहे.

> चीनसह दक्षिण आमि पूर्व आशियाच्या अनेक देशांनी या भागावर आपला हक्क सांगितला आहे.

> गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांसोबत झालेल्या मीटिंमघअये शी जिनपिंग यांनी म्हटले होते, की आम्हाला येथे लष्कर तैनात करायचे नाही. मात्र अमेरिकेला शंका आहे की चीनला येथे लष्करी तळ स्थापन करायचे आहे त्यामुळे त्यांच्या लष्करी कारवाया येथे वाढल्या आहेत.