आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Weather Heavy Snow Fall In Himalaya Valley

उत्तराखंडमध्ये प्रचंड हिमवृष्टी; दोन दिवसांत तीस ठार, अंत्यसंस्‍काराचा मोठा प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- उत्तराखंडमध्ये दोन दिवसांपासून तुफान हिमवृष्टी होत आहे. यामुळे दिल्‍लीसह उत्तरप्रदेशात हुडहुडी भरली आहे. उत्तराखंडात अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या हिमवृष्टीने 30 जणांचा बळी घेतला आहे. अनेक भागात शून्यच्या खाली पारा गेला आहे. अल्मोडा, पिथौरागड आणि बागेश्वरमध्ये मृत लोकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. लोक हवामान बदलाच्या प्रतिक्षेत आहेत.

दोन दिवसांत 30 मृत्युमुखी...
उत्तराखंड राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, कुमाऊं जिल्ह्यात 13 लोकांचा मृत्यु झाला आहे. नैनीतालमध्ये तीन, हल्द्वानीमध्ये दोन, बागेश्वरमध्ये तीन आणि भीमतालमध्ये एकाचा मृत्यु झाला आहे.

पिथौरागड जिल्ह्यात एक कार खोल दरीत कोसळल्याने दोघांना मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. तसेच तीन जण जखमी झाले आहेत. सुदूर भागात काहीही काही लोकांचा मृत्यु झाल्याचे समजते.

कुल्‍लू-मनालीत न जाण्याचे पर्यंटकांना आवाहन...
हिमाचलमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरु आहे. त्यामुळे कुल्‍लू-मनालीत न जाण्याचा पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे. हिमाचलमध्ये हिमवृष्टीमुळे दिल्‍लीसह संपूर्ण देशात थंह वारे वाहात आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये किमान तापमान 6.6 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले आहेत.

दशकाचा विक्रम मोडला...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्मोडामध्ये गेल्या चार दशकांचा अशी हिमवृष्टी झाली नाही. तर पिथौरागडमध्ये यंदा हिमवृष्टीने 46 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. कुमाऊंमध्या दोन फूट बर्फ जमला आहे.

अनेक भागात दाटला अंधार...
कुमाऊं जि‍ल्ह्यात हजारो वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. विशेष म्हणजे पाईप लाईनमध्ये बर्फ जमल्याने अनेक भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेकडो पर्यटक अडकले...
उत्तराखंडमध्ये ‍जोरदार हिमवृष्टी होत असल्याने शेकडो टूरिस्ट अडकले आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, दिल्लीसह अन्य राज्यातील गारठून टाकणारे PHOTO