आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Will Cancel Foreign Secretary Level Engagement With Pakistan

भूयार तयार करुन घुसले होते दहशतवादी? रद्द होऊ शकते सचिव स्तरीय बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट एअरबेसवरील हल्ल्या दरम्यान आर्मीच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. - Divya Marathi
पठाणकोट एअरबेसवरील हल्ल्या दरम्यान आर्मीच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले.
नवी दिल्ली - या महिन्यात होऊ घातलेली भारत-पाकिस्तान परराष्ट्र सचिव स्तरीय बैठक रद्द होऊ शकते. दुसरीकडे, पठाणकोट एअरबेसवरील हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी भूयार तयार केले असण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.

दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या पद्धतीवर का उपस्थित होत आहे प्रश्नचिन्ह
सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बॉर्डरवर भुयार तयार करुन घुसखोरी केल्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत दहशतवादी तारा कापून एअरबेसमध्ये घुसल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. हल्ल्यानंतर बीएसएफ दहशतवादी कसे घुसले असतील याच्या सर्व शक्यता पडताळून पाहात आहे. गृहमंत्र्यांनी बीएसएफला विचारले आहे, की एवढे दहशतवादी बॉर्डर पार करुन कसे काय आत घुसले ?

चर्चा रद्द होऊ शकते का ?
- परराष्ट्र सचिव स्तरीय चर्चा 14-15 जानेवारी रोजी होणार आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार, जर पाकिस्तानने हल्ल्यासाठी जबाबदार लोकांवर कारवाई केली नाही तर बैठक होणे अवघड आहे, आणि यासाठी फार कमी वेळ शिल्लक राहिला आहे.
पाकिस्तानच्या कोणत्या एअरबेसवर दहशतवाद्यांचे ट्रेनिंग
- सूत्रांच्या माहितीनुसार, पठाणकोटवर हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या लायलपूर किंवा चकलाला एअरबेसवर ट्रेनिंग दिले गेले होते.
- दहशतवाद्यांना एअरक्राफ्टस्, हँगर्स, शस्त्रागार, फ्यूल स्टेशन याबद्दल सविस्तर माहिती होती. शस्त्रास्त्रांसह त्यांच्याकडे असे पावडर होते, ज्यामुळे लावण्यात आलेली आग विझवणे अवगड होते.

भारताने पाकिस्तानला सोपवले पुरावे
- पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारताना पाकिस्तान सरकारला सोपवले आहे.
- भारताने पाकिस्तानला या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यास सांगितले आहे.