आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Will Finish War In 96 Hours With Both China And Pakistan

अवघ्या 96 तासांत पाकिस्तानला चीत तर चीनला रोखू शकतो भारत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय सीमेवरवर पाकिस्तानच्या 'नापाक' हरकती थांबण्याचे चिन्हे दिसत नसताना जम्मूमध्ये पाक सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाक सैन्याने सोमवारी भारतीय चौक्यांना टार्गेट केले होते.

दुसरीकडे, चीनच्या सीमेवर 35 नव्या चौक्या उभारण्याची भारतीय लष्कराची योजना आहे. यामुळे चीनमध्ये तणाव वाढला आहे. चीनच्या प्रभावशाली थिंक टॅंकचे विशेषतज्ज्ञांने हा चेतवण्याचा प्रयत्न असून चीन सैन्यात तणाव निर्माण करण्याचा हा भारतीय फंडा असल्याचेही म्हटले आहे. सरकार दैनिक ग्लोबल टाइम्समध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या लेखात शंघाई इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे (एसआयआयएस) विशेषज्ज्ञ लिउ जोंगई यांनी म्हटल्यानुसार, सीमेवर नव्या चौक्या उभारणे हा संवेदनशील मुद्दा आहे. चीन आणि भारत यांच्यात 1962मध्ये झालेले युद्ध जवाहर लाल नेहरु सरकारकडून सुरु झालेले फॉरवर्ड पॉलिसीचा परिणाम होता. चीन आणि भारतामध्ये नियंत्रण रेषेवरून (एलओसी) वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. भारताच्या नव्या चौक्यामुळे नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून शकते. यामुळे सीमाभागात आणखी तणाव वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

भारताच्या सीमेवर एकूण 150 चौक्या आहेत. 3400 जवान नियंत्रण रेषेवर लक्ष ठेवून आहेत. सीमेवर आणखी 35 चौक्या उभारल्या जाणार असल्याचे आयटीबीपीचे डीजी अजय चड्‍ढा यांनी सांगितले होते. चीन सैनिकांनी अतिक्रमण केलेल्या भागात अतिरिक्त जवान तैनात करण्यात येणार असल्याचेही चड्‍ढा यांनी म्हटले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. 'चीन आणि पाकिस्तान विरोधात भारताची तयारी?'