आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Will Go For Covert Operation To Get Dawood And Saeed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोव्हर्ट ऑपरेशन: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि कुख्यात हाफिजचा खात्मा करू शकतो भारत?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रात सत्तेत बदल झाल्यानंतर देशाअंतर्गत तसेच सीमेवरील सुरक्षेच्या रणनितीत बदल करण्याचे काम सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भारत सरकार अमेरिकेप्रमाणे एबटाबाद स्टाइलमध्ये गुप्त ऑपरेशन (कोव्हर्ट ऑपरेशन) सुरू करण्याची शक्यता आहे.पाकिस्तानात लपून बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मोस्ट वॉन्टेड दहशवादी हाफिज सईदचा ओसामा बिन लादेनप्रमाणे खात्मा करण्यासाठी भारत कोव्हर्ट अॉपरेशन सुरु करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हावर्ड युनिर्व्हसिटीमध्ये पीएचडी करत असलेले शशांक जोशी यांच्यासारखे काही सेक्युरिटी एक्स्पर्टच्या मते, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित ढोभाळ हे पाकिस्तानात गुप्त ऑपरेशन सुरु करू शकतात. एवढेच नव्हेतर स्वत: नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना पाकिस्‍तानातील एबटाबादमधील ऑपरेशनचा उल्लेख केला होता. दाऊदला पकडून पुन्हा भारतात आणले जाईल, असे मोदी यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात एका मुलाखतीत सांगितले होते. मोदींना योजनेबाबत विचारले असता त्यांना उलट प्रश्न केला होता, की ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यापूर्वी अमेरिकाने पत्रकार परीषद घेतली होती काय?

ढोभाळ करतील कोव्हर्ट ऑपरेशन?
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित ढोभाळ हे नेहमी 'गुप्त ऑपरेशन'च्या बाजूने बोलत आले आहेत. विशेष म्हणजे 2012 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात ढोभाळ यांनी कोव्हर्ट ऑपरेशनच्या समर्थनार्थ लिहिले आहे. गुप्त ऑपरेशनला विरोध करणार्‍या तत्कालीन कॉंग्रेस सरकारवर ढोबाळ यांनी अनेकदा टीका केली आहे. देशाच्या शत्रुला गुढघे ठेकण्यास मजबूर केले पाहिजे, असेही ढोबाळ यांनी म्हटले होते. परंतु कॉंग्रेस सरकारच्या काळात याबाबत साधा विचारही करण्यात आला नव्हता. त्यामुळे भारत सरकारच्या रणन‍ितीवर ढोभाळ यांनी यापूर्वी अनेकदा टिका केली होती.

अजित ढोभाळ यांच्यामते, युद्धाची पारंपरिक पद्धत फारच खर्चीक आहे. तसेच त्यात मोठी जोखीम आहे. भारतीय सीमेवर होणारी घुसखोरी आणि देशात होणार्‍या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी समोरासमोर युद्ध हाच एक पर्याय ढोभाळ यांनी सांगितला आहे.
ढोभाळ यांच्या मते, दहशतवाद्यांशी चर्चा करण्यासाठी चांगल्या तरुणांचा शोध घेतला पाहिजे. ते फिदायीन हल्लेखोरांची मानसिक चांगल्या पद्धतीने समजून घेतील, तसेच त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर देऊ शकतात. भारत देखील अमेरिकेप्रमाणे एबटाबादसारखे ऑपरेशन करू शकतो.
कुठे आहेत हाफिज सईद आणि दाऊद?
प्रसारमाध्यमामधून झळकलेल्या वृत्तानुसार, भारताच्या सत्तेत बदल झाल्यानंतर पाकिस्तानाच्या गुप्तचर संस्था आयएसआयने दाऊद इब्राहिमला कराचीतून अफगानिस्तानच्या सीमेवर हलवले आहे. या भागात तालिबान दहशतवाद्यांचा मोठा प्रभाव आहे. तसेच मुंबईत झालेल्या सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला '26/11'चा मास्टर माइंड हाफिज सईद लाहोरमध्ये राहतो. पाकिस्तानी पोलिसांच्या सुरक्षेत तो एका बंगल्यात राहतो. बंगल्याबाहेर सुरक्षा जवान 24 तास तैनात असतात. बंगल्यात हाफिजचे कार्यालय आणि एक मशिद आहे.
हाफिजच्या शिरवर (मुंडके) अमेरिकेन 60 कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. असे असतानाही सईद हा पाकिस्तानात खुलेआम वावरतो. प्रचारसभा घेऊन भारताविरोधात दहशतवादी कारवाई करण्याची धमकी देत आहे. अमेरिकेतील 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या एका रिपोर्टरने सईदची मुलाखत त्यांच्या राहत्या घरात घेतली होती. फेब्रुवारी, 2013 मध्ये घेतली होती.

कोव्हर्ट ऑपरेशन हाच पर्याय का?
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 1993 मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवणारा अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम आणि 2008 मध्ये मुंबईत दहशवादी हल्ला घडवून आणलेला मास्टर माइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तान सरकारचे मोठे पाठबळ मिळत आहे. याचे पुरावे भारताकडे आहे. दोन्ही मोस्टवॉन्टेड दहशतवाद्यांना हवाली करण्‍याची मागणी भारताने पाकिस्तानकडे लावून धरली आहे. दाऊद पाकिस्तान असूनही पाकिस्तान नेहमी त्याला विरोध करत आला आहे. हाफिज सईदविरोधात कोर्टात खटला सुरु आहे. दाऊदकडे भारताबाबत संपूर्ण माहिती देण्याचे काम आयएसआय करते. दोन्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानने भारताला सोपवले नाही, तर भारत पाकिस्तानात जाऊन सईद आणि दाऊदचा खात्मा करू शकतो. भारताप्रमाणे पाकिस्तान अण्वस्त्रशक्ती आहे. त्यामुळे यावेळी पारंपारिक युद्ध हा पर्याय फारच वेळ खाऊ शकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितित सईद आणि दाऊदचा खात्मा करण्‍यासाठी कोव्हर्ट ऑपरेशन एक उत्तम पर्याय ठरू शकतो असे ढोबाळ यांनी सांगितले आहे.

कसे केले जाते ओव्हर्ट आणि कोव्हर्ट ऑपरेशन?
देशाच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर दोन प्रकारचे ऑपरेशन केले जाते. त्यातील पहिले म्हणजे ओव्हर्ट आणि दुसरे कोव्हर्ट. ओव्हर्ट ऑपरेशनबाबत आधीच सूचना दिल्या जातात. याचा अर्थ असा, की याबाबत संपूर्ण जगाला माहिती असते. उत्तर-पश्चिम पाकिस्तानात सध्या सुरु असलेले जर्ब-ए-अज्ब हे अशाच प्रकारचे ऑपरेशन आहे. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत आहे. पाकिस्तान सरकारने या ऑपरेशनची सूचना आधीच दिली होती. याउलट कोव्हर्ट ऑपरेशन असते. यात अत्यंत गोपनियता पाळली जाते. कोव्हर्ट ऑपरेशनबाबत काही मोजक्याच लोकांना माहिती असते. बहूतेकदा तर या ऑपरेशनचे निष्कर्ष जगासमोरही येत नाहीत. मे, 2011 मध्ये पाकिस्तानातील एबटाबादमध्ये अमेरिकेने ओसामा बिन लादेनविरोधात सुरु केले होते. या ऑपरेशनला अमेरिकेने 'नेप्च्यून स्पिअर' असे नाव दिले होते. या ऑपरेशनला कोव्हर्ट ऑपरेशन म्हणता येईल.

एबटाबादमध्ये नेमके काय झाले होते?
पाकिस्तानातील एबटाबाद शहरात अमेरिकेच्या दहशतवादी विरोधक पथकाने ऑपरेशन नेप्च्यून स्पिअरमध्ये अल कायदाचा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. अमेरिकन कमांडोने ओसामाचा खात्मा करून त्याला अरबी समुद्रात जलसमाधी दिली होती. अमेरिकेने या ऑपरेशनमध्ये प्रचंड गोपनियता पाळली होती. पाकिस्तान सरकारलाही याबाबत बर्‍याच उशीरा माहिती म‍िळाली होती.
(फाइल फोटो: लाहोर येथे या घरात राहतो हाफिज सईद. घराबाहेर 24 तास सुरक्षा जवान तैनात असतो. )