आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MEA Writes To UK High Commission, Seeks Vijay Mallya\'s Deportation

विजय माल्ल्यांना भारताकडे सोपवा; भारताने लिहिले यूकेला पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विविध बँकांचे ९,४०० कोटींचे कर्ज थकवून परदेशात पळ काढणाऱ्या विजय मल्ल्या यांना भारतात परत आणण्याच्या प्रयत्नांना वेग अाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी मल्ल्यांच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनला पत्र लिहिले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, दिल्लीच्या ब्रिटन उच्चायुक्तांकडे मल्ल्यांना भारतात पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासासाठी मल्ल्यांना भारतात आणणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करणे आणि त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वाॅरंट बजावण्यात आल्याचीही माहिती उच्चायुक्तांना देण्यात आली आहे. याशिवाय ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांनीही ब्रिटिश परराष्ट्र व राष्ट्रकुल कार्यालयाकडे या संदर्भात विनंती केली आहे.

दरम्यान, भारत-ब्रिटनमध्ये प्रत्यार्पण करार झालेला असला तरी मल्ल्यांना भारतात परत आणणे सोपे नाही. करारातील नववे कलम मल्ल्यांना वाचवू शकते. प्रत्यार्पणासाठी आपल्याला त्रास दिला जात असल्याची तक्रार ते करू शकतात. यामुळे त्यांना भारतात आणण्यात विलंब होऊ शकतो किंवा ते ब्रिटनमधूनही पळ काढू शकतात.
भारताने पत्रात काय लिहिले...
> परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी पत्रकार परिषदेत या बाबत माहिती दिली.
> त्‍यांनी सांगितले, ''दिल्‍लीत असलेल्‍या ब्रिटेनच्‍या उच्‍चायुक्‍तांना पत्र लि‍हून माल्‍यासंदर्भात माहिती मागितली. ''
> ''ब्रिटिश सरकारकडे आम्‍ही हा मुद्दा लावून धरणार आहोत.''
> ''यूकेमध्‍ये असलेल्‍या भारतीय उच्‍चायुक्‍तांनीसुद्धा याच प्रकारचे पत्र यूके आणि कॉमन्वेल्थ ऑफिसेजला पाठवले.

माल्‍यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द
> समन्स बजावूनही माल्‍या हजर झाले नाहीत, त्यामुळे मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी 'ईडी'ने केली होती.
> त्यानुसार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांतर्गत असलेल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने माल्‍यांचा पासपोर्ट चार आठवड्यांसाठी स्थगित केला.
> माल्‍या यांनी लंडनला जाताना राज्यसभा खासदार असल्याने मिळालेल्या डिप्लोमॅटिक पासपोर्टचा वापर केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या अडचणी येणार....