आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Operation Cactus An Indian Military Involvement In Maldives

ऑपरेशन कॅक्टस: जेव्हा भारतीय हवाई दलाने मालदिवमध्ये दाखवली होती ताकद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऑपरेशन कॅक्टसमध्ये मालदिवची राजधानी माले येथे भारतीय जवान)
भारतीय हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी करण्यात आली. हा दिवस भारतीय हवाई दल दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त ठिकठिकाणी हवाई दलाचे कार्यक्रम आणि चित्तथरारक हवाई प्रत्याक्षिके आयोजित केली जातात. यावेळी भारतीय हवाई दलाने राबविलेल्या मोहिमांना उजाळाही दिला जातो.
ऑपरेशन कॅकटस 1988 मध्ये राबवण्यात आले होते. मालदिवमधील गयूम सरकारला हटवण्यासाठी दहशतवाद्यांनी जोरदार हिंसक कारवाया सुरु केल्या होत्या. सत्तांतर रोखण्यासाठी भारतीय हवाई दलाचे मालवाहू विमान 12 तासांच्या आत जवानांना घेऊन मालेला गेले होते. जाणून घ्या, या ऑपरेशन कॅकटसबाबत...
1988 मध्ये समुद्री डाकू आणि श्रीलंकेतील तमिळ दहशतवादी संघटना पीपुल्स लिबरेशन ऑर्गनायझेशनने मालदिववर हल्ला केला होता. मालदिवचे लष्कर या संकटासाठी तयार नव्हते. दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयांवर कब्जा केला होता. एअरपोर्ट, टेलिव्हिजन आणि रेडिओ स्टेशन सारख्या महत्त्वपूर्ण ठिकाणांचा ताबा मिळवला होता.
मालदिवचे राष्ट्रपती मौमून अब्दुल गयूम यांना जेव्हा वाटले, की त्यांचे लष्कर दहशतवाद्यांचा सामना करु शकणार नाही तेव्हा त्यांनी तत्कालिन भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांना मदत मागितली. राजीव गांधी यांनी 1600 जवानांना मालदिवच्या मदतीसाठी पाठविले होते. गयूम यांनी मदत मागितल्यानंतर केवळ 12 तासांत भारतीय जवानांनी मालदिवचा ताबा घेतला होता. यावेळी भारतीय नौदलाच्या दोन नौका INS गोदावरी आणि INS बेतवा याही तेथेच गेल्या होत्या.
पुढील स्लाईडवर बघा, ऑपरेशन कॅकटसचे फोटो...