आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर हातातून जायला नको, पटेलांचा होता सैन्याला आदेश; हवाई दलाचा रोल ठरला महत्त्वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय हवाई दलाने काश्मीरच्या मदतीसाठी धावून गेले. - Divya Marathi
भारतीय हवाई दलाने काश्मीरच्या मदतीसाठी धावून गेले.
नवी दिल्ली - देश स्वतंत्र झाल्यानंतर रॉयल इंडियन एअरफोर्सला पहिला आदेश सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिला होता. पाकिस्तानी लष्‍कराने काश्‍मीरवर हल्ला केला होता. हल्ल्याची माहिती दिल्लीत धडकली. काश्‍मीरचा राजा हरिसिंगने भारताला मदत मागितली. या मदतीबाबत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि सैन्य दलांच्या प्रमुखांनी आपापली मते मांडली. त्यांच्या म्हणण्‍यानुसार काश्‍मीरमध्‍ये सैन्य पाठवू नये. सरदार पटेल यांनी सर्वांची मते ऐकून घेतली आणि शेवटी मोठ्या आवाजात म्हणाले, तुम्ही तयारी करा. वायुदलाची विमाने उद्या तुम्हाला काश्‍मीरमध्‍ये घेऊन जाण्यास सज्ज असतील. कोणत्याही परिस्थितीत काश्‍मीर हातातून गेला नाही पाहिजे, असा आदेश पटेलांनी भारतीय सैन्याला दिला.
 
8 ऑक्टोबर इंडियन 'एअरफोर्स डे' आहे. DivyaMarathi.com या निमित्ताने भारतीय हवाई दलाविषयी सांगत आहे. भारतीय हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्‍ये ब्रिटिश कालखंडात झाली होती. तेव्हा दलास रॉयल इंडियन एअरफोर्स म्हटले जात होते. 

देशाच्या फाळणीच्या काही महिन्यांनंतर पाकिस्तानने काश्‍मीरवर हल्ला केला. त्यावेळी काश्‍मीर हे स्वातंत्र संस्थान होते. या संस्थानाचे राजे हरिसिंग गोंधळलेले होते. याचा फायदा घेत पाकिस्तानने आपल्या सैन्याला काश्‍मीरवर हल्ला करायला पाठवले. त्यांची संख्‍या लाखांत होती. पाकिस्तानी सेनेने काश्मीर संस्थानामध्‍ये प्रवेश करताच हरिसिंग यांनी भारतात सामील होण्यास मान्यता दिली आणि भारतीय सैन्याची मदत मागितली. रॉयल इंडियन एअरफोर्सच्या मदतीने लष्‍कराच्या तुकड्या रणभूमीवर उतरु लागल्या. भारतीय लष्‍कर काश्‍मीरमध्‍ये पोहोचताच भारत आणि पाकिस्तान दरम्यान युध्‍द सुरु झाले. पण या युध्‍दाची औपचारिक घोषणा झाली नाही.
 
पुढील स्‍लाइड्स वाचा, पाकिस्तानने काश्‍मीरवर हल्ला केला...
बातम्या आणखी आहेत...