आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Amry ITBP And Uttrakhand Police Is Rescuing Stranded People In Kedarnath And Joshimath

निसर्गाचा प्रकोप भोगतोय उत्‍तराखंड अन् स्वित्झर्लंडला निघाले मुख्यमंत्री!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाचा प्रकोप झालेल्या उत्तराखंडमध्ये हजारो लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती आपत्ती निवारण केंद्राने गृहमंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे. तसेच भूस्खलनामुळे 70 हजारांहून लोक अद्याप बेपत्ता आहे. केदारनाथ येथे केवळ 'नाथ'च सुखरूप आहे. असे असताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री ‍विजय बहुगुणा सपत्नीक स्वित्झर्लंड दौर्‍याची तयारी करत आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, उत्तराखंडात महाप्रलायाने हाहाकार माजला असताना मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी स्वित्झर्लंडला जाण्याची तयारी केली आहे. बहुगुणा यांचा हा दौरा पूर्वनियोज‍ित आहे. बहुगुणा यांचा हा दौरा शासकीय आहे. त्यामुळे काही अधिकारीही त्यांच्यासोबत जात आहे. परंतु भीषण पाऊस आणि पूरस्थितीमुळे मुख्यमंत्री बहुगुणा आपला नियोजित दौरा पुढे ढकलतील अशा आशा व्यक्त केली जात होता. परंतु याबाबत बुधवारी मु्‍ख्यमंत्री कार्यालयातून परराष्‍ट्र मंत्रालयाला कोणतीही सूचना मिळाली नाही. त्यामुळे मंत्रालयाने बहुगुणा यांच्या स्वित्झर्लंड दौर्‍याला ग्रीन सिग्नल दाखविण्यात आला आहे. राज्यात भीषण पूरस्थिती असताना मुख्यमंत्री बहुगुणा यांचा स्वित्झर्लंड दौर्‍याची आवश्यकता आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे, रुद्रप्रयाग ते केदारनाथपर्यंत सर्व ठिकाणी महाप्रलयाने हाहाकार माजला आहे. उत्तराखंडमधील 60 गावे भूसपाट झाले असून हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आपत्ती निवारण केंद्राने गृहमंत्रालयात सादर केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे.

काली कमली धर्मशाळा, भारत सेवा आश्रम आणि गढवाल विकास मंडळचे एक हॉटेल उध्वस्त झाले आहे. या तिन्ही धर्मशाळांमध्ये हजारो नागरिक होते. तसेच परिसरातील रामबाडा बाजारही पुरात वाहून गेला आहे. तसेच आजूबाजूच्या छोट्या गावांमध्ये अद्यापही मदत पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे मृतांचा आकडा काही हजारांमध्ये जाण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडच्या प्रकोपातील हजारो बेपत्ता लोकांचा शोध घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पण सततचा पाऊस आणि दरडी कोसळणे सुरु असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कैलास मानसरोवर यात्राही वर्षभरासाठी रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान उत्तराखंडमध्ये सरासरीपेक्षा 450 टक्के अधिक पाऊस झाला आहे. पावसानंतर सगळीकडे गाळाचे साम्राज्य पसरले असून या महाप्रलयात सुमारे 200 कार, दोन जेसीबीही वाहून गेल्याचे समजते. तसेच परिसरातील रस्त्यांवरील पूलही वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

केदारनाथमध्ये सर्वाधिक फटका बसला आहे. तेथे बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु परिसरातील रस्ते खचल्यामुळे अनेक गावांपर्यत मदत पोहचलेली नाही. स्थानिक प्रशासनाच्या सूत्रांनुसार आतापर्यंत 19 हजारांहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. परंतु अजून सुमारे 62 हजार नागरिक उत्तराखंडमधील विविध जिल्ह्यात अडकले आहेत.

उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाचा सर्वाधिक फटका केदारनाथ खोर्‍यातील गावांना बसला आहे. तब्बल 60 गावे भूसपाट झाली असून अनेक गावांचा गेल्या तीन दिवसांपासून संपर्क तुटला आहे. मृतांचा आकड्याने हजारी ओलांडल्याचीही भीती आपत्ती निवारण केंद्राने गृहमंत्रालयाला दिलेल्या माहितीत व्यक्त केली आहे.

केदारनाथमध्ये 90 धर्मशाळा होत्या. तसेच काही खासगी लॉजही होत्या. त्यातील यात्रेकरू अद्याप बेपत्ता आहे. तसेच स्थानिक रहिवाशांबाबतही काही पत्ता नाही. बचाव पथक अद्याप अनेक गावांपर्यत पोहचलेले नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... उत्तराखंडमधील महाप्रलयाची भीषणता..!