आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घुसखोरी : सिक्‍क‍िम सीमेवर भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झाली झटापट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : लडाखच्या देमचोकमध्ये काही दिवसांपूर्वी चीनी घुसखोरांनी घुसखोरी केल्यानंतर येथील नागरिक रस्त्यावर उतरले होते.
नवी दिल्‍ली - चीनच्या सैन्याच्या भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना वाढलेल्या असतानाच अरुणाचल प्रदेश आणि लडाखनंतर सिक्कीमध्ये एक नवे प्रकरण समोर आले आहे. येथे घुसखोर करण्याचा प्रयत्न करणा-या चीनी सैन्याबरोबर भारतीय जवानांची झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे.

गंगटोकहून 56 किलोमीटर लांब नाथुला बॉर्डरवर मंगळवारी चीनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये ही झटापट झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांचे सैनिक सीमेवर गस्त घालत होते. त्यावेळी गस्त घालणारी दोन्ही पथके समोरा समोर आली. सीमेच्या त्या बाजुला असणा-या चीनी सैनिकांपैकी काहीजण भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले. भारतीय जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. याचवेळी दोन्ही बाजुंच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. भारतीय लष्कराने पुढच्या फ्लॅग मिटींगमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, चीनच्या घुसखोरीनंतर भारताने चीनचे राजदूत ली युचेंग यांना बोलावून यासंदर्भात जाब विचारला होता. लडाखमध्ये सध्या भारतीय हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून 1000 चीनी आणि 1500 भारतीय सैनिक समोरा समोर आहेत. हा मुद्दा लवकरच सोडवला जाईल असा विश्वास युचेंग यांनी व्यक्त केला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा फोटो...