आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करप्रमुख म्हणाले..दगडफेक करणाऱ्यांनी गोळ्या चालवल्या तर चांगलेच; \'त्या\' कृत्याचे समर्थन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काश्मीरमध्ये ‘डर्टी वॉर’ सुरू आहे. या नव्या युद्धाशी निपटण्यासाठी नव्या पद्धती अवलंबाव्या लागतील, असे सांगत लष्करप्रमुख जनरल बिपिनसिंह रावत यांनी दगडफेक करणाऱ्या काश्मिरी युवकाला जीपला बांधून मेजर गोगोईंनी केलेल्या बचावाचे समर्थन केले.
या  प्रकरणाची कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू असली तरी दहशतवादाने पोखरलेल्या राज्यांमध्ये लष्कराचे मनोबल वाढवणे गरजेचे असल्याचे रावत म्हणाले. काश्मीरध्ये  लष्कराला बचावाचे नवीन मार्ग शोधावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.

ते पेट्रोल बॉम्ब फेकत असतील तर... : लोक जवानांवर पेट्रोल बॉम्ब फेकत असतील तर शांत राहून हे सहन करा आणि मरा, असे सैनिकांना सांगू काय? भारतीय लष्कराचे मनोबल टिकवणे माझे कर्तव्य आहे.मी याबाबत जवानांसाेबत आहे, एवढेच सांगतो, असेही रावत म्हणाले.
 काश्मीर समस्येवर राजकीय तोडगा काढण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी असे प्रयत्न आधी झाले नाहीत काय, असा सवाल उपस्थित केला.
 
जवानांना मरण्यासाठी सोडणार नाही
काश्मिरात जवानांवर पेट्रोल बॉम्ब फेकले जात असताना, दगडफेक केली जात असताना सैनिकांना मरण्यासाठी सोडून देणार का? सैनिकांवर पेट्रोल बॉम्ब हल्ले होत असताना केवळ बघ्यांची भूमिका घ्या अशा प्रकारचे आदेश मी देणार नाही. उलट दगडफेकीचे प्रकार रोखण्यासाठी अशाच प्रकारच्या कल्पक युक्तींची सध्या गरज आहे असे लष्करप्रमुख बिपीन रावत म्हणाले.
 
त्यांनी दगडफेक ऐवजी गोळीबार करायला हवा
दगडफेक करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत लष्करप्रमुख म्हणाले, दगडफेक करणाऱ्यांनी सैनिकांवर एकदाचे गोळीबार करायला हवे होते. तेव्हा मलाही बरे वाटले असते. मग, आम्हाला सुद्धा हवे तसे उत्तर देता आले असते.
 
काय आहे प्रकरण?
अनंतनाग पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशी गस्त लावणाऱ्या पोलीस आणि लष्कराच्या ताफ्यांवर दगडफेक करण्यात आली. त्यावेळी दगडफेकीचे प्रकार थांबवण्यासाठी मेजर लीतुल गोगोई एका युवकाला जीपच्या बोनटवर बांधले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जम्मू आणि काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेकांनी तीव्र विरोध केला. तर काहींनी त्याचे समर्थन सुद्धा केले. लष्करी जीपवर त्या युवकाला बांधले नसते तर दगडफेक करणाऱ्यांवर गोळीबार करण्याची नामुष्की ओढावली असती असा दावा मेजर गोगोई यांनी केला.
 
जेएलएफचा अध्यक्षयासिन मलिक अटकेत
श्रीनगर - जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष यासिन मलिकला त्याच्या निवासस्थानातून रविवारी सकाळी अटक करण्यात आली. यासिन मलिकने शनिवारी हिजबुलचे मारले गेलेले अतिरेकी सब्जार अहमद भट आणि फैजान मुजफ्फर यांच्या त्राल येथील घरी भेट दिली होती. शनिवारी त्राल येथे सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले होते. या मृत्यूच्या निषेधाार्थ मलिक आणि हुरियतच्या दोन गटांनी दोन दिवसांच्या काश्मीर बंदची घोषणा केली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...