आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी कायदा रद्द करण्याची ही वेळ नाही : लष्करप्रमुख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-काश्मिरातील लष्कराचा विशेषाधिकार कायदा रद्द करण्याची ही योग्य वेळ नाही आणि त्यावरून राजकारण करण्याचा हा मुद्दाही नाही, अशा शब्दात लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंह यांनी विशेषाधिकार कायदा रद्द करणाची मागणी करणार्‍या राजकीय पक्षांना फटकारले.

दिल्लीतील एका परिसंवादात बोलताना विक्रमसिंह यांनी लष्कराचा विशेषाधिकार कायदा रद्द करण्यास लष्कराचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. जम्मू-काश्मिर,मणिपूरसह ईशान्येकडील राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे.राज्यातील काही भागात लागू असलेला हा कायदा काढून घेण्यात यावा अशी मागणी जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना विक्रमसिंह म्हणाले, या कायद्यासंदर्भात लष्कर केवळ शिफारस करु शकते.परंतु आजच्या परिस्थितीत या कायद्याची मोडतोड करु नये असेच माझे स्पष्ट मत आहे. या मुद्यात राजकारण आणू नये राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून ठरवावे पाकिस्तानी सरहद्दीलगत दहशतवाद्यांचे अड्डे कायम असल्याचे सांगून श्रीनगरात झालेल्या हल्यात मारला गेलेला एक अतिरेकी हा पाकिस्तानी नागरिक होता.असेही त्यांनी सांगितले.