आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जिकल स्ट्राइक: थेट म्यानमारमध्ये जाऊन जवानांच्या हत्येचा बदला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या मोहिमेत सहभागी झालेल्या जवानांचा ग्रुप फोटो. सुरक्षेच्या कारणांमुळे चेहरे झाकण्यात आले आहेत. - Divya Marathi
या मोहिमेत सहभागी झालेल्या जवानांचा ग्रुप फोटो. सुरक्षेच्या कारणांमुळे चेहरे झाकण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - अखेर भारताने सॉफ्ट स्टेटची भूमिका फेकून दिली. मणिपूरमध्ये १८ जवानांच्या हत्येचा बदला घेत भारतीय कमांडोजनी म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार केले. बऱ्याच वर्षांनंतर भारतीय लष्कराने शत्रूच्या परिसरात जाऊन अशी कारवाई फत्ते केली. इस्रायली लष्कर अशा कारवाईत तरबेज समजले जाते.
सोमवारी रात्री दोन ठिकाणी तीन तासांच्या कारवाईत चार चकमकी झाल्या. त्यात दहशतवाद्यांचे दोन अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. त्याबाबत विचारणा केली असता लष्करातर्फे, ‘अशा कारवाईत कमांडो कारवाई करतात. मृतदेहांची मोजदाद करत नाहीत,’ असे सांगण्यात आले. एडीजीएमओ मेजर जनरल रणबीर सिंह आणि मेजर रुचिका यांनी सांगितले की, या कारवाईत आमच्या एकाही सैनिकाला साधा ओरखडाही उमटला नाही.
भास्कर एक्स्पर्ट
ऑपरेशन अचूक होते, पुढेही अशी कारवाई
-लेफ्टनंट जनरल (रि.)एस. ए. हसनैन

-या सर्जिकल स्ट्राइकचे परिणाम काय होतील?
ईशान्येतीलजवानांचे मनोधैर्य या ऑपरेशनने उंचावेल. आपले लष्कर शत्रूच्या बालेकिल्ल्यात घुसून हल्ला करू शकते, हा विश्वास वाढेल. आता असे ऑपरेशन आणखीही केले जातील.

-हे ऑपरेशन पाकिस्तानसाठीही संकेत आहेत? पीओकेमध्ये अशी कारवाई केली जाऊ शकते?
अवघडआहे. म्यानमारचे लष्कर सरकार आपले मित्र आहेत. यामुळे आपल्याला मदत मिळाली. पण पाक सीमेवरील अतिरेकी, पाक सरकार, त्यांचे लष्कर आयएसआय सर्व शत्रू आहेत. यामुळे तेथे असे ऑपरेशन सोपे नाही.

-हे आपले पहिलेच सर्जिकल आॅपरेशन आहे?
एका अर्थी होय. यापूर्वी १९९५ मध्ये ‘गोल्डन बर्ड’ नावाने म्यानमार आपल्या लष्कराने संयुक्त ऑपरेशन केले होते. पण ते ‘सर्च अँड हंट’ आॅपरेशन होते, सर्जिकल नव्हे.

-या ऑपरेशनला किती अचूक संबोधता येईल?
अशाऑपरेशनसाठी हाय क्वालिटी इंटेलिजन्स, नेतृत्व जोरदार तयारीची गरज असते. यात हे सर्वकाही होते. आणखी एक बाब, मारलेले सर्व जवान डोगरा रेजिमेंटचे होते. लष्करप्रमुख, ऑपरेशनची माहिती देणारे मेजर जनरल रणबीर सिंहही त्याच रेजिमेंटचे आहेत. हे रेजिमेंटचे मनोधैर्य वाढवण्याचे द्योतक आहे.

पुढील स्लाइडमध्ये, अशी झाली कारवाई....