आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Army Para Commandos Carried Out Myanmar Hot Pursuit

अजित डोभाल हेच \'म्‍यानमार ऑपरेशन\'चे सूत्रधार, पॅरा कमांडोनी फत्ते केले मिशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- म्यानमारच्या सीमेत घुसून भारतीय जवानांनी जवळपास 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल 13 तास हे ऑपरेशन चालले. भारतीय जाबाज जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मणिपूरच्या चंदेलमध्ये 4 जून रोजी दहशवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. भारतीय जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध हे ऑपरेशन राबविले. यात म्यानमारच्या सैन्याचीही मदत घेण्यात आली.

म्‍यानमार सीमेतील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी लष्कराने फक्त चार दिवसांचे नियोजन केले होते. राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल हेच या ऑपरेशनचे सूत्रधार आहेत. डोभाल यांच्या नेतृत्त्वात हे नियोजन करण्‍यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही वेळोवेळी अपडेट माहिती दिली जात होती. नऊ जून रोजी 13 तासांत ऑपरेशन यशस्वी करून भारतीय जवान म्यानमारमध्ये सुखरूप पोहोचले आहेत.

भारतीय लष्काराच्या स्पेशल पॅरा कमांडोंनी दहशतवाद्यांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करून जवळपास 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराची कोणतीही जीवितहानी झाली नाही.
डोभाल यांच्या अनुभवाची लष्कराला झाली मदत
राष्‍ट्रीय सुरक्षेचे सल्लागार अजीत डोभाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बांगलादेश दौर्‍यावर जाणार होते. परंतु या ऑपरेशनसाठी डोभाल यांनी या दौर्‍यावर जाणे ऐनवेळी टाळले. डोभाल मणिपुरमध्ये इंटेलिजेंस ब्युरोच्या माहितीवर लक्ष ठेवून होते. डोभाल जेव्हा आयबीमध्ये होते, तेव्हा 1986 मध्ये पूर्वोत्तरमध्ये दहशवाद्यांविरुद्ध मोहिम हाती घेतली होती. डोभाल यांचा हाच अनुभव लष्कराच्या कामात आला.

1986 मध्ये डोभाल यांचे अंडरकव्हर ऑपरेशन शानदार होते. लालडेंगा दहशतवादी समूहातील सात कमांडोंना त्यांनी भारताच्या बाजूने केले होते. त्यामुळे इतर कमांडोंनी भारतासोबत शांततेचा करार केला होता.
1968 च्या बॅचचे केरल कॅडरचे अजित डोभाल हे आयपीएस अधिकारी आहेत. डोभाल यांनी 6 वर्षे पाकिस्तानात अंडरकव्हर एजेन्ट म्हणून काम केले आहे. डोभाल यांना पाकिस्तानी उर्दूसह अनेक भाषा येतात.

डोभाल यांनी यासाठीच रद्द केला होता बांगलादेश दौरा
18 जवानांच्या मृत्युला बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने अजित डोभाल यांच्या नेतृत्त्वाखाली चार दिवसांच्या ऑपरेशनचे नियोजन केले होते. यामुळे डोभाल यांनी सहा जूनला बांगलादेशाचा दौरा रद्द केला होता. डोभाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बांगलादेशात जाणे टाळले होते. डोभाल काही दिवसांपासून मणिपूरमध्येच होते. इंटेलिजेंस ब्युरोकडून (आयबी) मिळणार्‍या माहितीवर लक्ष ठेवून होते.

13 तासांत ऑपरेशन फत्ते
हवाई दलाच्या मदतीने लष्काराचे म्यानमारमध्ये तब्बल 13 तास ऑपरेशन चालले. या ऑपरेशनमध्ये सुमारे 30 दहशतवादी ठार झाले. ऑपरेशन सोमवारी मध्यरात्री 3 वाजता अंधारात सुरु झाले. पण ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतरच संध्याकाळी याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली.
भारतीय हवाई दलाच्या एमआय 17 चॉपरच्या मदतीने कमांडोंना दहशतवाद्यांच्या कॅम्पजवळ पोहोचवले. आंतरराष्‍ट्रीय सीमेच्या सुमारे पाच किलोमीटर अंतरावरच जवान उतरले. तेथून कारवाई सुरु केली. 20-20 कमांडोंची दोन गट बनवले. हे ऑपरेशन 45 मिनिटे सुरु होते. या ऑपरेशनची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कारवाईत भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही.

ऑपरेशन ऑलआऊट: सरकार-लष्काराचे डावपेच असे...
1.जूनच्या हल्ल्यानंतर लष्करी गुप्तहेरांना कळले की हल्लेखोर म्यानमारच्या जंगलांत लपले आहेत. ते पुढील अतिरेकी हल्ल्याचा कट रचत असल्याचीही माहिती मिळाली.

2.लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग एनएसए अजित डोभाल यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सीमेपार जाऊन हल्ल्याची रणनीती आखली. जेणेकरून अतिरेक्यांना संधी मिळू नये.
3.पीएमओकडून हल्ल्यासाठी मंजुरी घेतली. आंतरराष्ट्रीय परिणामांच्या पार्श्वभूमीवर म्यानमारचे सरकार लष्कराशी चर्चा झाली. पीएमओ सुहाग यांनी ही व्यवस्था केली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काय म्हणाले लेफ्टनंट जनरल (रि.)एस.ए. हसनैन