आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता माघार नाही: चीन सीमेवर भारतीय लष्कराने ठाेकले तंबू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय सैनिकांना मागे हटण्याचा इशारा देताना चिनी सैनिक... (फाईल) - Divya Marathi
भारतीय सैनिकांना मागे हटण्याचा इशारा देताना चिनी सैनिक... (फाईल)
नवी दिल्ली - चीनच्या आक्रमक भूमिकेला तोडीस तोड उत्तर देत भारतीय लष्कराने सीमेजवळील डोकलाम भागात तळ ठोकला आहे. भारत, चीन आणि भूतानच्या सीमेला लागून असलेल्या या भागातून भारतीय सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी चीन सातत्याने दबाव आणत आहे. तेथे तैनात भारतीय सैनिकांनी तंबू ठाेकत दीर्घकाळासाठी मुक्कामाचे संकेत दिले आहेत. 
 
सूत्रांनुसार, डोकलाममध्ये तैनात सैनिकांना आवश्यक रसदचा अखंडित पुरवठा केला जात आहे. हा चीनला स्पष्ट संकेत आहे की, भारतीय लष्कर त्याच्या कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही. जोवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक परतत नाहीत तोवर भारतीय लष्करही येथून माघार घेणार नाही. या परिस्थितीत सिक्कीम सेक्टरमध्ये सुमारे १० हजार फुटांच्या उंचीवरील या क्षेत्रात भारत-चीन लष्करादरम्यान निर्माण झालेला तणाव आणखी लांबण्याची चिन्हे आहेत. उभय देशांत तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून संघर्ष निर्माण झालेला आहे.
 
पाच वर्षांपूर्वी सहमती, आजवर अयशस्वी : दोन्ही देशांतील वादावर लवकरच कूटनीतिक तोडगा निघेल, असा विश्वास सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे. आधीही याच माध्यमातून ताेडगा निघाला होता. तथापि, आपण कोणत्याही समझोत्यासाठी तयार नसल्याचे चीनने म्हटले आहे. सुरक्षा संस्थांनुसार तणाव कमी करण्यासाठी एकतर्फी भूमिका घेता येऊ शकत नाही. उभय देशांत विविध पातळ्यांवरील चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी २०१२ मध्ये प्रयत्न करण्याबद्दल एकमत झाले होते. मात्र, आजवर ते प्रत्यक्षात दिसू शकलेले नाही.
 
हे पण वाचा,
 
बातम्या आणखी आहेत...