आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांना रसद पुरवणार्‍या पाकिस्तानी चौक्यांवर डागली क्षेपणास्त्रे, व्हिडिओ सार्वजनिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ जम्मू - पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने नौशेरालगत असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेच्या पलीकडील ५ ते ६ चौक्यांवर हल्ला करून भारताच्या दिशेने गोळीबार करणाऱ्या चौक्या उद्ध्वस्त केल्या. यात १० ते १५ पाकिस्तानी सैनिकही मारले गेल्याचे वृत्त आहे. या कारवाईत लष्कराने क्षेपणास्त्रांचाही वापर केला. हे उद्ध्वस्त बंकर्स ताबा रेषेपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर होते. या कारवाईचा व्हिडिओही लष्कराने जारी केला आहे.
 
जनरल अशोक नरुला यांनी मंगळवारी माहिती दिली. व्हिडिओत दाट जंगलात क्षेपणास्त्रे पडल्यानंतर प्रचंड धूर येत असल्याचे दिसत आहे. ताबा रेषेलगत केलेली अशातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. कारवाईची तारीख व वेळ नरुला यांनी सांगितली नाही. सूत्रांनुसार, ९ किंवा १० मे रोजीची ही कारवाई आहे.

घुसखोरी रोखण्यासाठी कारवाई आवश्यक
- अतिरेक्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करताना मागून गोळीबार करून घुसखोरांना मदत करणाऱ्या पाक चौक्या होत्या लक्ष्य.
- मेजर जनरल नरुला म्हणाले, पाकिस्तानी लष्कराचे जवान भारतीय चौक्यांना लक्ष्य करून सशस्त्र घुसखोरांना नेहमीच मदत करत आहेत. कुरापती रोजच कमी-अधिक प्रमाणात सुरू होत्या.
- ताबा रेषेलगतच्या गावांनाही आता लक्ष्य केले जात आहे. या कुरापती थांबवण्यासाठी कठोर कारवाईची गरज होती.
- बर्फ विरघळू लागताच घुसखोरीचे प्रयत्न वाढतील. यामुळे अितरेक्यांचे घुसखोरीचे पारंपरिक मार्ग मोकळे होतील. त्यामुळे भारतीय लष्कराने अशी कारवाई करणे गरजेचे होते.
- तीन आठवड्यांपूर्वी पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसून दोन जवानांचा शिरच्छेद केला होता. त्याच वेळी भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले जाईल, परंतु वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू, असे जाहीर केले होते.

नौशेराच का?
या भागातील लाँच पॅडवर काही अतिरेकी एकत्र आल्याची माहिती होती. या भागात वारंवार युद्धबंदी मोडून पाकिस्तान घुसखोरांना मदत करतो. हा भाग जम्मू सेक्टरमध्ये येतो. जम्मू शहरापासून हा भाग अवघ्या १०० किमी अंतरावर आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा व्हिडिआे आणि भारताची नवी रणनीती...
बातम्या आणखी आहेत...