आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Army Rocks Trends On Twitter After Myanmar Operation

अतिरेक्यांच्या खात्म्यासाठी कोणतीही सीमा ओलांडणार, म्यानमार कारवाईनंतर सरकारची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - म्यानमारमध्ये घुसून अतिरेक्यांच्या खात्मा करण्याच्या धडक कारवाईचा अवघ्या भारतात जयजयकार होत आहे. केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षाचे नेते आणि सर्वसामान्यांनी लष्कराला सलाम ठोकला. केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, लष्कराची ही कारवाई सर्व अतिरेकी संघटनांसाठी एक मोठा धडा आहे. आम्ही अतिरेक्यांच्या खात्म्यासाठी कोणतीही सीमा ओलांडण्यास कुचराई करणार नाही.

दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केले, भारतीय लष्कराच्या शूर जवानांना माझा सलाम. इंडियन आर्मी रॉक्स. कर्नलपदावरून निवृत्त झालेले माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले, ही काळाची गरज होती. सर्वांनी हे समजून घ्यावे की, ही काही कुस्ती नाही. ज्यात तुम्ही तुमच्या इलाख्यात परत जाल अन् तुम्हाला कुणीही पकडणार नाही. तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात जाऊन दडलात तरी आम्ही प्रत्युत्तर देऊच. काँग्रेस पक्षानेही टि्वटमध्ये म्हटले, मणिपुरात साहसी यशाबद्दल लष्कराला सलाम, जयहिंद.

लष्कराने सोमवारी रात्री उशिरा ऑपरेशन ऑलआऊट पार पाडले होते. यात मणिपूर हल्ल्यात सहभागी असलेल्या ८० पेक्षा जास्त अतिरेक्यांना ठार करण्यात आले होते. तथापि, त्याचा अचूक आकडा सरकारने सांगितलेला नाही.

पाकिस्तान हा म्यानमार नव्हे : निसार खान
पाकिस्तानचे गृहमंत्री निसार खान बुधवारी म्हणाले, पाकबाबत भारताने गैरसमज बाळगू नये. पाकिस्तान हा काही म्यानमार नाही. आमच्या फौजांना विदेशी हल्ल्यांना उत्तर देणे माहीत आहे. भारतीय नेत्यांनी दिवास्वप्ने पाहू नये. दरम्यान, पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, भारताने पाकला धडा शिकवण्याची भाषा केली तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ.

या कारवाईने भारत-चीन संबंधांवर परिणाम होईल
सध्या भारत आणि चीन विश्वास बहाल करण्याच्या प्रयत्नात आहेत. या कारवाईमुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून जागतिक पातळीवर भारताला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढेही भारताने अशा कारवाया केल्यास अरुणाचल प्रदेशात १९८६ मध्ये झालेल्या वानडंगसारखी प्रकरणे होऊ शकतात. भारतावर उत्तर देण्याची वेळ येऊ शकते.-
द डॉन (पाकिस्तान)

अत्युत्तम गुप्तवार्ता व डावपेचांचा परिपाक : भारतीय लष्कराची ही कारवाई अत्युत्तम गुप्तवार्ता, रणनीती व सामंजस्याचा परिपाक आहे. त्याकडे पाहून कळते की भारतीय लष्कर जगातील सर्वाेत्तम स्ट्राइक फोर्सपैकी एक आहे. - न्यूयॉर्क टाइम्स (अमेरिका)

दोन्ही लष्करांदरम्यान ऐतिहासिक पाऊल
ही कारवाई दोन्ही लष्करांमधील सामंजस्याचे एेतिहासिक पाऊल आहे. आशियात दहशतवादाचा खात्मा करण्यासाठीचे हे पाऊल प्रशंसनीय आहे. भारताच्या या कारवाईने शेजारी देशांतील अतिरेक्यांना धडकी बसेल. हे अमेरिकी नेव्ही सील्सप्रमाणे केलेले काम आहे.
- बीसीसी (लंडन)


म्यानमारचा इन्कार
दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई भारतीय हद्दीतच करण्यात आल्याचे म्यानमारने म्हटले आहे. शेजारी राष्ट्रांवर हल्ले करू पाहणाऱ्या बंडखोरांना थारा देणार नाही, असे अध्यक्षीय कार्यालयाचे संचालक झा ताय यांनी फेसबुकवर नमूद केले.
दरम्यान, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल लवकरच म्यानमारला जाणार असून बंडखोर गटांविरुद्ध संयुक्त कारवाईबाबत ते चर्चा करतील.आसाममध्ये एन्काउंटर, जितेंद्रसिंह मणिपुरात

{आसामच्या कोक्राझार जिल्ह्यात पोलिस-लष्कर कारवाईत एनडीएफबीचा अतिरेकी ठार.
{पंतप्रधानांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांना मणिपुरात पाठवले.
{जितेंद्रसिंह तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. ते अरुणाचल प्रदेश व नागालँडमध्येही जातील.
{मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात म्यानमारजवळील सीमेवर बाॅम्बस्फोट, जीवितहानी नाही.
७० कमांडोज,
४० मिनिटे
{म्यानमारच्या हद्दीत ७० कमांडोजनी केली कारवाई. {३८ नागा बंडखोरांचा ४० मिनिटांच्या कारवाईत खात्मा. {जवान मंगळवारी ध्रुव हेलिकॉप्टरने उतरले. {दोन गटांत विभागून दहशतवाद्यांच्या दोन प्रशिक्षण छावण्यांच्या दिशेने कमांडोजनी केली कूच.