आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Authority Of Airport News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील २९ विमानतळांचे अमेरिकेत सादरीकरण, औरंगाबादचा देखील समावेश!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील विविध भागाची संपर्क यंत्रणा सक्षम करण्याच्या उद्देशाने भारतीय विमान प्राधिकरण(एएआय) शिकागोत आयोजित एअरलाइन्स व विमानतळ प्रतिनिधींच्या बैठकीत २९ मेट्रो व नॉन मेट्रो विमानतळांचे सादरीकरण करणार आहे.या परिषदेस एएआयचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिकारी या विमानतळांचे आधुनिकरण केले जात असल्याचे माहिती देतील. २९ विमानतळांमध्ये औरंगाबादचा समावेश आहे.

शिकागो परिषदेत हवाई वाहतुकीचा नवा व्यवसाय व नव्या हवाई मार्गांवर चर्चा होईल. वर्ल्ड रुट कॉन्फरन्समध्ये ज्या २९ विमानतळांवर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे, त्यात औरंगाबाद, अमृतसर, चंदिगड, जयपूर, लखनऊ, लेह, श्रीनगर, वाराणसी, भुवनेश्वर, गया, कोलकाता, पोर्ट ब्लेअर, रांची, रायपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, भोपाळ, पुणे, गोवा, इंदूर आदींचा समावेश आहे.