आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांना करता येणार हवाई सफर, कमीत कमी तिकीट दर 2000 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतामध्ये आजही विमान प्रवास ही लक्झरीयस बाब आहे. एका विशिष्ट वर्गापर्यंतच ही सेवा अजून सीमित आहे. सर्वसामान्यांनाही विमान प्रवास करता यावा आणि यातून भारतीय हवाई क्षेत्राचाही विकास व्हावा असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने एक योजना तयार केली आहे. त्यानूसार, छोट्या शहरांमध्ये हवाई प्रवासाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. छोट्या शहरांमधील हा प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याच्या दृष्टीनेही मंत्रालय विचार करत आहे.

काय आहे प्रस्ताव
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानूसार छोट्या शहरांमध्ये दोन ते अडीच हजार रुपयांमध्ये हवाई सफर करता येणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत या योजनेबद्दल जनमत जाणून घेण्यात येणार आहे. या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहमती असल्याचेही सांगितले जात आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कसा होणार विमान कंपन्यांना फायदा