आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Captain Mithali Raj Become The First Women Player To Cross 6000 Runs In ODI History

विश्वविक्रमानंतर मिताली राजचे दिग्गज खेळाडूंनी केले अिभनंदन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली   - भारतीय महिला क्रिकेटसाठी १२ जून २०१७ हा दिवस ऐतिहासिक ठरला.  या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने ६९ धावांची अर्धशतकी खेळी करून विश्वविक्रम केला. या खेळीदरम्यान मितालीने महिला क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पा गाठणारी जगातील पहिली खेळाडू बनण्याचा मान मिळवला. याशिवाय महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रमही तिच्या नावे झाला आहे. मितालीच्या नावे आता ६०२८ धावा झाल्या आहेत.  
 
महिला कर्णधार मितालीच्या शानदार खेळीनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या. याशिवाय क्रिकेट क्षेत्राशी संबंधित अनेक दिग्गजांनी तिचे अभिनंदन केले. सचिन तेंडुलकर, सेहवाग, कोहली यांनी मितालीचे अभिनंदन केले. 
 
मितालीचे अभिनंदन करताना कोहलीने केली चूक 
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा मिताली राजचे अभिनंदन केले. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम मिताली राजने केला आहे. या कामगिरीने भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला, असे िट्वट कोहलीने केले. मात्र, या िट्वटसह त्याने मितालीचा नव्हे, तर पूनम राऊतचा फोटो पोस्ट केला. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी कोहलीला टार्गेट केले. 
 
दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा
> अभिनंदन मिताली. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज बनल्याबद्दल मनस्वी अभिनंदन. ही मोठी कामगिरी आहे. शिवाय तुझी आजची खेळीसुद्धा शानदार होती.
- सचिन तेंडुलकर  

>संपूर्ण भारताला मिताली राज, तुझ्यावर अभिमान आहे. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम करणे, ही खूप मोठी कामगिरी आहे.  
- वीरेंद्र सेहवाग.  

> मी मिताली राजला वयाच्या १० व्या वर्षापासून ते वनडेत ६००० धावा काढेपर्यंत पाहिले आहे. मला तुझा अभिमान आहे मिताली. अशीच प्रगती कर.
-व्ही.व्ही.एस.लक्ष्मण.  
 
> मिताली  महिलांत धावा काढणारी फलंदाज झाली आहे, हे ऐकून मी खूप आनंदित झालो आहे. मनस्वी शुभेच्छा.
- अनिल कुंबळे.  

> महिला क्रिकेटमधील भारतीय रन मशीन म्हणजे मिताली राज. अभिनंदन.
- गौतम गंभीर.  
 
हे पण वाचा, 
बातम्या आणखी आहेत...