आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय कंपन्यांमध्ये समान संधी देण्यास टाळाटाळ, 50 टक्के कर्मचारी भेदभावाचे बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतातील उद्योगांमध्ये काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना समान वागणूक किंवा संधी मिळत नसल्याचे समोर आले आहे. कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार 50 टक्के कर्मचार्‍यांनी कामाच्या ठिकाणी त्यांच्याबरोबर भेदभाव होत असल्याचे सांगितले.


नियुक्ती आणि काम करताना या भेदभावाला बळी पडत असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. लीजच्या टीमने हे सर्वेक्षण केले आहे. कार्यालयांमध्ये सामान्यपणे सर्वांना समान वागणूक दिली जाते. पण अजूनही विविध प्रकरणांमध्ये आणि विशेषत: नियुक्ती करताना भेदभाव होत असल्याचे समोर आले आहे. नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 10 पैकी 5 कर्मचार्‍यांनी भेदभाव होत असल्याचे सांगितले.

काम करण्याची क्षमता, वय आणि स्त्री पुरुष या आधारावर भेदभाव होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. गर्भवती किंवा लहान मूल असणार्‍या महिला अशा प्रकारच्या भेदभावाला सर्वाधिक बळी पडत असल्याची माहिती समोर आली आहे.