आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 Jan : राजपथावर अवतरली भारतीय संस्कृती, महाराष्ट्राच्या वारीसह लेझिम, गोंधळही सादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये लष्करी जवानांच्या संचलनानंतर विविध राज्यांच्या चित्ररथांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. राज्यांनी आपआपल्या देखाव्यांमध्ये त्यांच्या संस्कृतीशी संबंधित अशा विविध बाबींचा समावेश केला होता. महाराष्ट्राच्या पंढरपूरच्या वारीचा त्यात समावेश होता. त्याचबरोबर विविध मंत्रालयांनी सादर केलेल्या देखाव्यांमध्ये त्या मंत्रालयांच्या योजनांचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

महाराष्ट्राचा ठसा
राजपथावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थित झालेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्रानेही ठसा उमटवला. संचलनानंतर सादर करण्यात आलेल्या देखाव्यांमध्ये महाराष्ट्राच्या वारी सोहळ्याचा देखावा सादर करण्यात आला होता. लय भारी चित्रपटातील प्रसिद्ध माऊली... माऊली... गाण्याच्या तालावर चित्ररथ राजपथावर दाखल झाला आणि संपूर्ण राजपथच जणू विठूनामाच्या जयघोषात रंगून गेला. त्यानंतर दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय लोककलाप्रकार गोंधळ सादर केला, तर नागपूरच्या विद्यार्थ्यांनी लेझिम सादर करत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, विविध राज्यांच्या देखाव्यांचे आणि सादरीकरणाचे PHOTO
फोटो - सौजन्य डीडी नॅशनल