नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जपानचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत आणि जपान यांच्यामधील संबंध दृढ होण्यासाठी मनमोहन सिंग यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्याबद्दल मनमोहन सिंग यांना 'द ग्रॅंड कार्डन ऑफ द आर्डर ऑफ द पाउलोलिया फ्लावर' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जपानी दूतावासाने दिली आहे.
'जपानचे सरकार आणि जपानी जनतेचे प्रेम आणि
आपुलकीने आपण भारावून गेल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. दरम्यान, जपानच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड होणारे मनमोहन सिंग हे पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत.