आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानच्‍या सरकारी छापखान्‍यात छापले जाते भारतीय नकली चलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतामधील नकली नोटा पाकिस्‍तानमध्‍ये छापल्‍या जात असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे. रॉ, एनआयए, आयबी, या गुप्‍तचर संस्थांना याचे पुरावे मिळाले आहेत. छापलेल्‍या नोटांचा कागद आणि शाई पाकिस्‍तानी छापखान्‍यातीलच आहे. नकली नोटांच्‍या माध्‍यमातून भारतीय अर्थव्‍यवस्‍थेला विस्कळित करण्याचे काम पाकिस्‍तान करत आहे, अशी माहिती गुप्‍तचर संस्‍थांनी गृहखाते, अर्थखाते तसेच संसदेच्‍या स्‍थायी सभागृहाला दिली आहे.

नोटा छापण्‍यासाठी जीएसएमच्‍या वॅक्‍सपिक कागदाचा तसेच ऑलिविली कागदाचा उपयोग केला जात आहे. बांगलादेश, नेपाळ, थायलंड, मलेशिया, श्रीलंका आणि चीनमधून भारतामध्‍ये नकली चलन येत आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, कधी किती नोटा छापल्‍या गेल्‍या...