आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Girl Geeta Return From Pakistan On 26 October

पाकिस्तानातून 26 ऑक्‍टोबरला भारतात येईल गीता, गावात आनंदाला उधाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - 14 वर्षांपुर्वी चुकून पाकिस्तानात पोहोचलेली गीता 26 ऑक्‍टोबरला भारतात येणार आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या विषयाची पुष्टी केली आहे. गीताचे कुटूंब बिहारच्‍या सहरसामध्‍ये राहते. गीता तिच्‍या घरी परतणार असल्‍याने गावात आनंदाला उधाण आले आहे. ती समझौता एक्‍सप्रेसने लाहोरला पोहचली होती, असे बोलले जाते. पाकिस्‍तान पोलिसांनी नंतर तिला शेल्‍टर होममध्‍ये नेले होते. पुढे तिला ईदी फाउंडेशनकडे सोपवण्‍यात आले.
गावात आनंदाला उधाण
गीता पाकिस्‍तानातून भारतात येत असल्‍याने बिहारमधील तिच्‍या गावात आनंदाला जणू उधाणच आले आहे. ती बिहारच्‍या कबीरा ढाप या गावातील रहिवासी आहे. सहरसा जिल्‍ह्यात हे गाव आहे. गावातील लोकांचा दावा आहे की, गीताला एक पती आणि मुलगाही आहे. गीताचे खरे नाव हीरामणी आहे. तिला गीता हे नाव पाकिस्तानमधील एका सामाजिक संघटनेने दिले आहे.

एका इंग्रजी दैनिकाच्‍या माहितीनुसार गीताच्‍या काकाने म्‍हटले की, "" ती सुरक्षीत गावात परत यावी याची आम्‍ही आतुरतेने वाट पाहात आहो.'' गीताला घरी आणण्‍यासाठी शासनाकडून प्रयत्‍न केल्‍या जात असल्‍यामुळे तिच्‍या भावांनी शासनाचे आभार मानले आहेत. एवढ्या दिवसांपर्यंत गीताची काळजी घेणा-या पाकिस्तानच्‍या ईदी फाउंडेशनचेही त्‍यांनी आभार मानले आहेत. परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्वराज म्‍हणाल्‍या की, डीएनए टेस्टनंतर गीताला तिच्‍या कुटुंबाकडे सोपवण्‍यात येईल.

गावकरी म्‍हणतात..
गीता ही शांती देवी आणि जनार्दन उर्फ जयनंदन महतो यांची मुलगी आहे. जयनंदन पंजाबमध्‍ये मजुरी करतात. गीता जालंधरच्‍या जवळ असलेल्‍या करतारपूर येथून हरवली होती. एका यात्रेनिमीतत्‍त ती तेथे गेली होती, तेव्‍हा ही घटना घडली. गीताच्‍या वडिलांनी तिचे लग्‍न गावातील उमेश महतो याच्‍याशी करून दिले होते. तेव्‍हा गीता 12 वर्षाची होती. उमेशही त्‍याच्‍या सास-याप्रमाणे पंजाबमध्‍ये मजुरी करून पोट भरत होता. उमेश आणि गीता यांना संतोष नावाचा एक मुलगाही आहे. तो आता 12 वर्षाचा आहे, अशी माहितीही ग्रामस्‍थांनी दिली आहे. मात्र, गीताचा पती आणि मुलगा सध्‍या कुठे आहे याविषयी माहिती नसल्‍याचे गावातील लोकांचे मत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, गीताचे विविध फोटो..