काश्मिर समस्या थंडबस्त्यात गुंडाळून ठेवता येणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी केले आहे. काश्मिर प्रश्न सुटल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता नांदू शकत नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. त्याला कारणही तसेच आहे. ही समस्या सुटणे आता अत्यंत अवघड आहे. शिवाय यावर भारताला चर्चा करायची नाही, याची जाणिव असल्याने पाकिस्तानने अशी भूमिका घेतली आहे. पण काश्मिर समस्या एवढी जटील झाली तरी कशी, सुरवातीला साधा वाटणारा हा प्रश्न उभय देशांमध्ये वादाचा विषय का ठरला, काश्मिरमध्ये दहशतवाद का फोफावला, या समस्येवरुन दोन्ही देशांत तणावाचे वातावरण का पसरले, अशा अनेक प्रश्नांची उकल करायची असेल तर इतिहासात डोकावून बघावे लागेल. त्यात असे दिसून येईल की भारताने प्रारंभिच ही समस्या सोडवली असती तर आता ती तेवढी गंभीर झाली नसती. यात भारताचे परराष्ट्र धोरण, मुसद्देगिरी आणि राजकीय नेतृत्व अपुरे पडल्याचे दिसून येते. म्हणजेच जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने जर या 10 चुका केल्या नसत्या तर काश्मिरचे भिजत घोंगडे राहिले नसते.
पुढील स्लाईडवर वाचा, कोणत्या 10 चुका भारताला महाग पडल्या.... अजूनही हा प्रश्न का जटिल आहे... त्याची सोडवणूक होणे अशक्य असल्याचे का म्हटले जाते....