आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Home Ministry News In Marathi, Divya Marathi, Martyr

केंद्राकडे 'शहिदा'ची व्याख्याच तयार नाही, गृहमंत्रालयाचे उत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शहीद कोण? सीमेवर शत्रूंशी लढताना जीव गमावलेले जवान की देशातील अतिरेकी कारवाया, दंगली, नक्षलवाद, कट्टरपंथीयांशी मुलाबला करताना ठार झालेले सैनिक? फक्त लष्कराच्याच जवानांना शहीद संबोधले जाईल की पोलिस वा निमलष्करी दलांचे जवान व अधिका-यांनाही हा सन्मान मिळेल? यापैकी एकाही प्रश्नाचे केंद्र सरकारकडे उत्तर नाही. कारण सरकारदरबारी "शहीद' या शब्दाची कोणतीही व्याख्याच नाही.

गृहमंत्रालयानुसार, भारत सरकारने कोणत्याही दस्तऐवजात शहीद शब्दाची व्याख्या केलेली नाही. मात्र, सरकार विविध सशस्त्र दलांच्या जवानांनी दिलेल्या बलिदानात कसलाही भेदभाव करत नाही. शत्रूंशी लढताना अपूर्व शौर्य दाखवणा-यांना "अशोक चक्र' सन्मान प्रदान केला जातो. लष्कर, नौदल, हवाई दल तसेच एखाद्या राखीव वा प्रादेशिक सैन्याच्या सर्व पुरुष आणि महिला अधिकारी त्यासाठी पात्र आहेत. याचप्रमाणे कीर्तिचक्र व शौर्यचक्र सन्मानही प्रदान केले जातात. त्याची शिफारस संरक्षण मंत्रालयाकडून केली जाते. सेवाकाळ व निवृत्तीनंतरही समान फायदे मिळतात.

असे होते सवाल
दिल्लीचे आरटीआय कार्यकर्ते गोपाल प्रसाद यांनी गृहमंत्रालयाकडून माहिती मागवली होती. एकसारखेच काम करणा-या लष्करी व निमलष्करी दलांतील जवानांचा मृत्यू झाल्यास लष्कराचे जवान शहीद संबोधनाचे दावेदार आहेत का? की निमलष्करी दलांचे मृत जवान फक्त मृत म्हणून घोषित होतात का?