नवी दिल्ली - जगातील प्रसिद्ध फोर्ब्स मॅगझीनने जगातील सर्वात शक्तीशाल व्यक्तींची यादी जाहीर केली असून, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना या यादीत 15 वे स्थान देण्यात आले आहे. भारताचा हा नवा रॉकस्टार ब़ॉलीवूडमधील नव्हे तर जनतेने निवडून दिलेले
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत.
गुजरात दंगलींमध्ये नाव आल्यानंतर 2005 पासून 2014 पर्यंत मोदींच्या अमेरिका प्रवासावर बंदी लावण्यात आली होती. पण तरीही फोर्ब्सने मोदींनी केलेल्या विकासकामांचे कौतुक केले आहे. संपूर्ण जगात त्यांनी केलेल्या विकास कामांची चर्चा आहे. त्यामुळेच ते आज अमेरिका, चीन अशा देशांचे दौरे करत असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.
फोर्ब्सच्या या यादीत 72 नावे आहेत. त्यात मोदी एकटेच भारतीय नाहीत, मोदींशिवाय या यादीत 36 व्या स्थानी रिलायन्सचे मालक आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना स्थान देण्यात आले आहे. तर भारतीय वंशाचे लक्ष्मीनिवास मित्तल 57 व्या स्थानी आहेत. भारतीय वंशाचे सत्या नडेला 64 व्या स्थानी आहेत. नडेला माइक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत.
आधी कोण होते यादीत
यापूर्वीही फोर्ब्सच्या यादीत अनेक भारतीय व्यक्तींना स्थान देण्यात आलेले आहे. यात सर्वात पुढे आहेत
सोनिया गांधी. 2011 ते 2013 पर्यंत सोनिया गांधी या यादीत होत्या. 2011 मध्ये त्या 11 व्या स्थानी होत्या, तर 2013 मध्ये 22 व्या स्थानी घसरल्या होत्या. 2013 मध्येच भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांना यादीत 29 वे स्थान मिळाले होते. तर मुकेश अंबानी त्यावेळी 40 व्या स्थानी होते. त्याशवाय विप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजी यांचे 2011 च्या यादीत 61 व्या स्थानी नाव होते.
पुढील स्लाइडवर वाचा, कोण केव्हा होते या यादीत...