आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Journalists Barred Even From Standing Outside Gates Of Saarc Meet Venue In Pakistan

भारतीय पत्रकारांना गेटवरही उभे राहू दिले नाही; गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी घडलेला प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सार्क परिषदेच्या वेळी पाकिस्तानने भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रकरणात यजमानाची भूमिका बजावली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानवर चौफेर टीकाही झाली. पाकिस्तानने त्या वेळी भारतीय पत्रकारांशीही कोरडा व्यवहार केला.

सार्क परिषदेचे वृत्तांकन करण्यासाठी पाकिस्तानने सहा भारतीय पत्रकारांना व्हिसा दिला होता, पण त्यांना उद्घाटन सोहळ्यात जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. प्रवेशद्वारावर उभे राहून पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली हे राजनाथ सिंह यांचे स्वागत करत असतानाचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला असता त्यांना तेथूनही हटवण्यात आले. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दूरदर्शनच्या छायाचित्रकाराला कॅमेरा हटविण्यास सांगितले. तेव्हा भारताच्या एका ज्येष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने तीव्र विरोध दर्शवला. पाकिस्तानी छायाचित्रकार आणि पत्रकार उपस्थित अाहेत, मग फक्त भारतीयांना का हटवले जात आहे, असा प्रश्न या अधिकाऱ्याने विचारला. पण पाक अधिकाऱ्यांनी अत्यंत कोरड्या आवाजात त्यांना जाण्यास सांगितले. भारतीयांना छायाचित्र घेता येऊ नयेत म्हणून वाट अडवण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...