नवी दिल्ली - इंडियन मेडिकल असाेसिएशनच्या (अायएमए) च्या माध्यमातून पहिले जनअाैषधींचे दुकान दिल्लीत शुक्रवारी अायएमएच्या मुख्यालयात सुरू करण्यात अाले अाहे. स्वातंत्र्यदिनापर्यंत देशातील अायएमएच्या १४०० शाखांमध्ये स्वतंत्रपणे ही अाैषधालये सुरू हाेत अाहेत.
ब्रॅन्डेड अाैषधांच्या नावाने रुग्णांची माेठ्या प्रमाणात अार्थिक लूट सुरू अाहे. ती थांबावी यासाठी केंद्रीय रसायन मंत्रालयाने जेनेरिक अाैषधांचा पुरस्कार केला अाहे. याची सुरुवात दिल्लीतून झाली. डाॅक्टर रुग्णांनाजेनेरिक अाैषधी लिहून देत नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी इंडियन मेेडिकल असाेसिएशनची मदत घेतली. सहा महिन्यांच्या चर्चेनंतर डाॅक्टरांनी अंतर्गत वादांना पूर्णविराम देत प्रत्येक शाखेमध्ये जनअाैषधींचे दुकान थाटण्याचा संकल्प केला अाहे. शुक्रवारी दिल्लीत सुरू करण्यात अालेल्या या दुकानातून प्रारंभी ११८ अाैेषधी ८० ते ९० टक्के सवलतीच्या दरात मिळणार अाहे. माेदी सरकारने ५०४ जेनेरिक अाैषधी पहिल्या टप्प्यात विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या अाहेत. वर्षाअखेर त्या हजारावर जाणार अाहेत. यूपीए सरकारच्या काळात केवळ १०२ अाैषधी उपलब्ध झाल्या हाेत्या, काही ठिकाणी जनअाैषधींची दुकाने सुरू करण्यात अाले हाेते. परंतु त्यातील बाेटावर माेजण्याइतके वगळता सर्वच बंद झालेली अाहेत. अहिर यांनी "दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले की, पुढच्या चार वर्षात केंद्र सरकार किमान ५० हजार जनअाैषधींचे दुकाने सुरू करणार आहे.
मेडिकल स्टाेअर्समध्ये अाता केवळ अाैषधीच, सेरेलॅक हटाव : केंद्रीय मंत्री अहिर यांनी नेस्लेच्या मॅगीवर ताेंडसुख घेताना विदेशी कंपन्यांची अनेक उत्पादने ही मेडिकल स्टाेअर्समध्ये विकायला ठेवली जातात अाणि डाॅक्टरही ती लिहून देतात, ही उत्पादने मेडिकल स्टाेअर्समध्ये विकायला बंदी घातली जाणार अाहे. सेरेलॅक हे स्वत्त्व पीठ ४०० रुपये किलाे दराने मेडिकल स्टाेअर्समधून विकले जाते. त्याचा निर्मिती खर्च केवळ २० ते ३० रुपये अाहे. बेबी साेप, अाॅइल, पावडर अशी अनेक प्रकारची विदेशी उत्पादने त्यात माेडत असल्याचेही त्यांनी सांगितले. मेडिकल स्टाेअर्समध्ये अशा उत्पादनांच्या विक्रीला यापुढे बंदी राहील यासाठी धाेरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
औषधीशास्त्र पदवीधरांना मिळणार जेनेरिक शॉप
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते १४ अाॅगस्ट राेजी या अभियानाचा शुभारंभ करण्यात येत असून या दिवशी ३ हजार अाैषधींची दुकाने सुरू करण्याचा निश्चय करण्यात अाला अाहे. ज्या तरुणांनी अाैषधीशास्त्राची पदवी घेतली अाहे त्यांना या अाैषधी उघडण्यास प्राथमिकता दिली जाणार असून प्रत्येक दुकानाला १ लाख रुपयांची अाैषधे माेफत देण्यात येतील. सामान्य अाणि जिल्हा रुग्णांलयांमध्ये या अाैषधी उपलब्ध हाेणार अाहेत. याबाबत केंद्र सरकार लवकरच अधिसूचना काढणार असून रुग्णांना अाैषधी लिहून देताना डाॅक्टरांना कंसात कॅपिटल अक्षरात जेनेरिक असे लिहून द्यावे लागेल.